Weather Forecast Maharashtra | राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Weather Forecast Maharashtra | राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून पुढील चार दिवस बहुतांश भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) ही माहिती दिली आहे. पुढील ४८ तासांत राज्याच्या चौफेर कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडणार आहे. (Weather Forecast Maharashtra)

आयएमडी पुणे कार्यालयातील हवामान अंदाज प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगड, गोंदिया, भंडारा आणि नागपूर भागातील बहुतांश भागात पुढील २ दिवस मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे. (Weather Forecast Maharashtra)

राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो. २४ ते २६ सप्टेंबर दरम्यान कोकण, मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

२५ आणि २६ सप्टेंबरला मात्र राज्याच्या संपूर्ण भागात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे.
पुण्यामध्ये पुढील दोन दिवस आकाश मुख्यत: ढगाळ राहील. दिवसभरात हलका ते
अतिहलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल. तसेच सोमवार आणि मंगळवारी हलका ते मध्यम स्वरुपाचा
आणि घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar | राहुल नार्वेकर यांनी दिल्ली दौऱ्याबाबत दिले स्पष्टीकरण; कायदेतज्ज्ञांच्या घेतल्या भेटी

Bachchu Kadu On BJP | ‘एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यास…’, बच्चू कडूंचा भाजपला इशारा

PMC To Start Signature Walk To Sinhagad Fort And Shivsrushti | ‘सिंहगडावर’ पर्यटनाच्या दृष्टीने
महापालिका सुरू करणार ‘सिग्नेचर वॉक’