अभिनंदन पुन्हा विमान उडवणार का ?; लष्कर प्रमुखांनी दिलं ‘हे’ उत्तर

कोईमतूर : वृत्तसंस्था- जवळपास 60 तासानंतर भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानने सुटका केली. त्यावर काल अभिनंदन यांनी पुन्हा उड्डाण करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर आज हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांना अभिनंदन यांच्या हवाई दलातील कमबॅक विषयी विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी अभिनंदन यांच्या पुन्हा उड्डाण करण्याच्या इच्छेवर आपले उत्तर दिले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

विंग कमांडर अभिनंदन पुन्हा विमान उड्डाण करू शकतात की नाही, हे त्यांच्या वैद्यकीय तंदुरुस्तीवरून ठरेल. अभिनंदन यांनी त्यांच्या विमानातून उडी घेतली. यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. त्यांच्यावर आवश्यक ते उपचार केले जात आहेत. ते शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त झाल्यावर कॉकपिटमध्ये परततील, असं उत्तर धनोआ यांनी दिलं.

मिग-21 विमानातून पाकिस्तानच्या एफ-16 विमानाचा जमिनदोस्त केलं. मात्र यात मिग-२१ ही खाली कोसळले. तेव्हा अभिनंदन पाकिस्तानात पडले. त्यानंतर जवळपास 60 तास ते पाकिस्तानच्या ताब्यात होते. आता भारतात परतल्यावरही अभिनंदन यांची आकाशाची ओढ कायम आहे. पुन्हा एकदा कॉकपिटमध्ये परतण्याची इच्छा त्यांनी कालच व्यक्त केली होती. मला लवकरच विमान उडवायचं आहे, अशी विनंती अभिनंदन यांनी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडे बोलून दाखवली होती.