फिल्डर जर्सी बदलत राहिला आणि फलंदाजाने घेतला ‘चौकार’; क्रिकेटमध्ये असेही होते (Video)

नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये कधी अजब तर कधी हास्यास्पद घटना घडत असतात. वर्ल्ड क्रिकेटमध्ये इतक्या लीग खेळल्या जात आहेत की, दररोज कुठला ना कुठला व्हिडिओ वायरल होतो. आता अबू धाबीमध्ये खेळल्या जात असलेल्या टी10 लीगचा समोर आलेल्या व्हिडिओच पहा. तो पाहून विश्वास बसणार नाही की, क्रिकेटमध्ये असे सुद्धा होऊ शकते.

टी10 लीगचा वायरल झालेला व्हिडिओ नॉर्दर्न वॉरियर्स आणि टीम अबू धाबीमधील सामन्यातील आहे. या सामन्यात टीम अबू धाबीने पहिल्यांदा बॅटींग करत 10 ओव्हरमध्ये 3 विकेटवर 123 धावा बनवल्या. उत्तरात 124 धावांचे लख्य नॉर्दन वॉरियर्सने मॅचच्या शेवटच्या चेंडूवर मिळवत 8 विकेटने सामना जिंकला. पण, जय-पराजयाच्या या खेळाच्या दरम्यान एक आश्चर्यकारक घटना सुद्धा घडली, जी सोशल मीडियावर वायरल होत आहे.

 

 

 

 

 

 

 

क्रिकेटमध्ये सुद्धा असे होते
ही मजेदार घटना घडली नॉर्दन वॉरियर्सच्या डावा दरम्यान. तिसरी ओव्हर सुरू होती. तिसरा चेंडू होता. वॉरियर्सचा सलामीचा फलंदाज सीम मुहम्मदने टीम अबू धाबीचा गोलंदाज ओवर्टनचा फुल टॉस चेंडू बॅकवर्ड पॉईंटवर खेळला. डिप बॅकवर्ड पॉईंटवर उभा टीम अबू धाबीचा फिल्डर रोहन मुस्तफा सीमारेषेकडे जाणार्‍या चेंडूला फिल्ड करण्यासाठी धावला, तेव्हा काही असे पहायला मिळाले जे आश्चर्यकारक होते.

फिल्डर जर्सी बदलत राहिला, चेंडू गेला सीमारेषा पार
फलंदाज वसीमच्या बॅटमधून निघून चेंडू जेव्हा सीमारेषेकडे जात होता, तेव्हा 32 वर्षांचा फिल्डर मुस्तफा मैदानावर खुलेआम आपली जर्सी बदलण्यात गुंग होता. मुस्तफा चेंडू पकडण्यासाठी धावला पण त्याचे लक्ष ना चेंडूकडे होते ना जर्सीकडे. मुस्तफा जर्सी बदलत राहिला आणि चेंडू सीमारेषेच्या पार गेला. परिणाम असा झाला की, फलंदाजाने आपल्या टीमसाठी चौकार मिळवला. त्याच्या या फिल्डिंग टॅलेंटवर प्रत्येकजण हसताना दिसत आहे.