ACB Demand Trap News | 1 लाखाची लाच मागणाऱ्या सहकार विभागातील क्लास वन अधिकार्‍यावर अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा दाखल

Pune ACB Trap | Operators of civic facilities centers caught in anti-corruption net while taking Rs 4,000 bribe for providing caste certificates
File Photo

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Demand Trap News | तक्रार अर्जाचा अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी दीड लाख रुपये लाचेची मागणी करुन एक लाख रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवणाऱ्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, नाशिक यांच्या कार्यालयातील सहकार अधिकारी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि.9) गुन्हा दाखल केला आहे. राजेश शंकर ढवळे Rajesh Shankar Dhavle (रा. कृष्णा अपार्टमेंट, फ्लॅट न ९, चेतना नगर, नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या क्लास वन अधिकाऱ्याचे नाव आहे. (ACB Demand Trap News)

याबाबत 53 वर्षाच्या व्यक्तीने नाशिक एसीबी कार्यालयात 6 सप्टेंबर रोजी तक्रार दिली होती. एसीबीच्या पथकाने पडताळणी करुन गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रार अर्जाचा अहवाल त्यांच्या बाजूने वरिष्ठांना पाठवण्यासाठी सहकार अधिकारी राजेश ढवळे यांनी दीड लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती एक लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. याबाबत तक्रारदार यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार केली. (ACB Demand Trap News)

नाशिक एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता राजेश ढवळे यांनी तक्रार अर्जाचा अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी दीड लाखांची मागणी केली. तडजोडी अंती एक लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. लाच मागितल्याप्रकरणी एसीबीने गुरुवारी मुंबई नाका पोलीस ठाण्यात ढवळे यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमक कलम 7, 7अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Nashik ACB Trap)

ही कारवाई नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर,
अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर,
पोलीस अंमलदार दिपक पवार, संजय ठाकरे, अविनाश पवार, चालक संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMP News | पीएमपी कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली गोड; ९ हजार ४५१ सेवकांना बोनस

Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंनी ओबीसी नेत्यांना डिवचले, म्हणाले – ’40 वर्षे आमचे आरक्षण खाल्ले, पण…’

Total
0
Shares
Related Posts