Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंनी ओबीसी नेत्यांना डिवचले, म्हणाले – ’40 वर्षे आमचे आरक्षण खाल्ले, पण…’

छत्रपती संभाजीनगर : Manoj Jarange Patil | ओबीसी नेत्यांनी (OBC Leader) ४० वर्षे आमचे आरक्षण खाल्ले हे सामान्य ओबीसींना पटले आहे. त्यामुळेच तो समाज आमच्या बाजूने आहे. आमच्याकडे पुरावे आहेत. ओबीसी बांधवांच्या मनात काहीही नाही. आत्तापर्यंत ४० वर्षे मराठा बांधवांचे नुकसान झाले आहे. आता ओबीसी लोकांना हे कळले आहे. गावागावांत हे परिवर्तन झाले आहे, असा दावा मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी १५ नोव्हेंबर २०२३ पासून महाराष्ट्रभर दौरा (Maharashtra Tour) करणार असल्याचे जाहीर केले.

मराठा समाजाला आवाहन करताना जरांगे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळणारच आहे. कुणबी प्रमाणपत्रे मिळण्यास सुरुवात झाली आहे. २४ डिसेंबरला आरक्षण मिळेल. कुणीही आत्महत्या करु नये. मराठा आरक्षणासाठीची एकी दिसली पाहिजे. काही मागेपुढे झाले तर सज्ज राहायचे आहे. कुणीही मतभेद होऊ देऊ नका. एकजूट ढळू द्यायची नाही.

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी महाराष्ट्र दौऱ्याची माहिती देताना म्हटले की, राज्यातील मराठा समाजाच्या गाठीभेटी घेण्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरू करत आहे. १५ नोव्हेंबर २०२३ पासून ते २३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत हा तिसरा टप्पा आहे. अशाप्रकारे सहा टप्प्यात दौरा करणार आहोत. पुढे चौथ्या, पाचव्या, सहाव्या टप्प्यातील दौरा करणार आहे.

मनोज जरांगे यांचा तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौरा

१५ नोव्हेंबर रोजी वाशी, परांडा, करमाळा.
१६ रोजी दौड, मायणी.
१७ रोजी सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड.
१८ रोजी सातारा, मेढा, वाई, रायगड.
१९ रायगड दर्शन, रायगड ते पाचाड, महाड, मुळशी, आळंदी.
२० रोजी आळंदी, तुळापूर, खालापूर, कल्याण.
२१ नोव्हेंबर रोजी ठाणे, पालघर, नाशिक, त्रंबकेश्वर.
२२ रोजी विश्रांतगड, संगमनेर, श्रीरामपूर.
२३ रोजी नेवासा, शेवगाव, भोदेगाव, अवमापूर, धोंडेगाव.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Cabinet Meeting | कॅबिनेटमध्ये गँगवॉरसारखी परिस्थिती, एका मंत्र्याच्या… संजय राऊतांच्या आरोपाला हसन मुश्रीफांचे उत्तर

Pune Police Mcoca Action | तलावारीचा धाक दाखवून व्यवसायिकांना लुटणाऱ्या रोहन चव्हाण व त्याच्या 5 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 81 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA