Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : खुनाच्या प्रयत्नातील गुन्ह्यात 10 वर्षे फरार असलेल्या सख्ख्या भावांना गुन्हे शाखेकडून अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Crime Branch | खुनाच्या प्रयत्नातील गुन्ह्यात तब्बल दहा वर्षे फरार असलेल्या दोन सख्ख्या भावांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपींवर 2014 साली गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार झाले होते. (Pimpri Chinchwad Crime Branch)

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पाहिजे, फरारी आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याची विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यापार्श्वभूमीवर सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी फरार, पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस नाईक शैलेश मगर यांना माहिती मिळाली की, वाकड पोलीस ठाण्यात 2014 साली दाखल झालेल्या 307, 143, 147, 148, 149 गुन्ह्यातील आरोपी गायकवाड डेअरी, वाकड येथे पेटींगचे काम करत आहेत.

त्यानुसार पोलिसांनी दत्त मंदिर रोडवर सापळा रचून विकी सुरेंद्र सहाणी उर्फ निशाद (वय- 29 रा. समर्थ दुध डेअरी पाठीमागे,
समर्थ कॉलनी, पिंपळे सौदागर), राजन सुरेंद्र सहाणी उर्फ निशाद (वय-40 रा. हनुमान मंदीराजवळ, औंधगाव, पुणे)
यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिले. आरोपींना वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे डोईफोडे,
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सतिश माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे,
सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप, पोलीस अंमलदार विजय नलगे, शैलेश मगर,
सुनिल कानगुडे, किरण काटकर, प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | विद्यार्थ्यांच्या हॉस्टेल फिमध्ये अपहार, डी.वाय.पाटील कॉलेजच्या कर्मचाऱ्यावर FIR

Supriya Sule On Paytm Scam | देशातील दुसरा सर्वांत मोठा भ्रष्टाचार पेटीएममध्ये, सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, निवडणूक रोख्यांच्या तपासाची केली मागणी

पिंपरी : महिंद्रा कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 10 लाखांची फसवणूक

Pune Crime News | पुणे: कॉलेज तरुणाला गांजाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी ! पोलिसांनीच उकळली 5 लाखांची खंडणी; पोलीस नाईक हेमंत गायकवाड, पोलीस शिपाई सचिन शेजाळ यांच्यावर FIR