Nashik Crime Branch News | नाशिक : एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Crime Branch News | आडगाव परिसरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या ड्रग्ज तस्कराला नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून 27 हजार 500 रुपयांचे 5.5 ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. धम्मराज उर्फ सागर बाळासाहेब शार्दूल (वय-18 रा. राजवाडा दिंडोरी रोड, म्हसरुळ नाशिक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.(Nashik Crime Branch News)

पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी शहरात अंमली पदार्थ विक्री व सेवन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाकडून अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांची माहिती घेतली जात असताना पोलीस अंमलदार विलास चारोस्कर यांना माहिती मिळाली की, सागर शार्दुल याच्याकडे एमडी हा अंमली पदार्थ असून तो हॉटेल शिवाच्या मागील हनुमान नगरकडे जाणाऱ्या रोडवर आडगाव शिवारात एमडी विक्री करण्यासाठी येणार आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सागर शार्दुल याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता 27 हजार 500 रुपये किंमतीची 5.5 ग्रॅम एमडी ड्रग्ज, दुचाकी, मोबाईल असा एकूण 87 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे
डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हेशाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, आडगावचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत,
पोलीस अंमलदार महेश साळुंके, सोमनाथ शार्दूल, देविदास ठाकरे, शरद सोनवणे, रमेश कोळी, धनंजय शिंदे,
मिलिंदसिंग परदेशी, विलास चारोस्कर, नितीन जगताप, राजेश राठोड, राहुल पालखेडे, जगेश्वर बोरसे, मुक्तार शेख,
अप्पा पानवळ, अमोल कोष्टी, समाधान पवार, अनुजा येलवे, निलेश काटकर, दादासाहेब वाघ यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | विद्यार्थ्यांच्या हॉस्टेल फिमध्ये अपहार, डी.वाय.पाटील कॉलेजच्या कर्मचाऱ्यावर FIR

Supriya Sule On Paytm Scam | देशातील दुसरा सर्वांत मोठा भ्रष्टाचार पेटीएममध्ये, सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, निवडणूक रोख्यांच्या तपासाची केली मागणी

पिंपरी : महिंद्रा कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 10 लाखांची फसवणूक

Pune Crime News | पुणे: कॉलेज तरुणाला गांजाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी ! पोलिसांनीच उकळली 5 लाखांची खंडणी; पोलीस नाईक हेमंत गायकवाड, पोलीस शिपाई सचिन शेजाळ यांच्यावर FIR