ACB Trap Case News | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सहायक उद्यान निरीक्षक आणि उपलेखापाल लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap Case News | कॉन्ट्रॅक्टरकडून 17 हजाराची लाच घेताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) सहाय्यक उद्यान निरीक्षकास (Assistant Park Inspector) आणि उपलेखापाल यांना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने (Anti Corruption Bureau Pune (ACB Pune) लाच घेताना रंगेहाथ पकडले आहेत. त्यांच्याविरूध्द भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये (Bhosari MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. (ACB Trap Case News)

सहाय्यक उद्यान निरीक्षक किरण अर्जुन मांजरे Kiran Arjun Manjre (46) आणि उपलेखापाल संजय देवराम काळभोर Sanjay Devram Kalbhor (वय-56) असे लाच घेणार्‍याची नावे आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यानामध्ये केलेल्या देखभालीच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी मांजरे यांच्याकडे विनंती केली होती. किरण मांजरे यांनी त्यासाठी तक्रारदाराने 17 हजार रुपयांच्या लाचेची (Pune Bribe Case) मागणी केली. (ACB Trap Case News)

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली होती. प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता किरण मांजरे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच उपलेखापाल संजय काळभोर यांनी देखील लाचेची मागणी करुन मांजरे यांनी केलेली लाचेची रक्कम देण्यास मदत केली. सापळा रचल्यानंतर सरकारी पंचासमक्ष सहाय्यक उद्यान निरीक्षक किरण मांजरे यांनी तक्रारदाराकडून 17 हजार रूपये घेतले. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये (Bhosari MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे (Pune ACB SP Amol Tambe),
अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे (Addl SP Dr. Sheetal Janve-Kharade)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे (PI Shriram Shinde),
पोलिस नाईक सुनिल सुरडकर, पोलिस अंमलदार सौरभ महाशब्दे, पोलिस अंमलदार चालक पांडुरंग माळी यांच्या पथकाने केली आहे.

 

 

Web Title :  ACB Trap Case News | Assistant Park Inspector and Deputy Accountant of Pimpri-Chinchwad Municipal Corporation arrested by anti-corruption

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा