ACB Trap Case News | प्रकरण मिटवुन घेण्यासाठी लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर एसीबीकडून FIR

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap Case News | विनयभंगाची तक्रार न घेता किरकोळ तक्रार घेऊन प्रकरण मिटवुन घेण्याच्या मोबदल्यात 30 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या एमआयडीसी पोलीस ठाण्यातील (Nagar MIDC Police Station) पोलीस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. नंदलाल मुरलीधर खैरे (Nandlal Muralidhar Khaire) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. खैरे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत बुधवारी (दि.11) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB Trap Case News)

याबाबत वडगाव गुप्ता येथे राहणाऱ्या 31 वर्षाच्या व्यक्तीने अहमदनगर एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या कुटुंबाचे व शेजारी राहणाऱ्यांमध्ये कचरा गोळा करून पेटवून देण्याच्या कारणावरून 10 जुलै 2023 रोजी वाद झाला होता. यामध्ये तक्रारदार यांची भावजयी किरकोळ जखमी झाली होती. त्यामुळे तक्रारदार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन शेजाऱ्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. (ACB Trap Case News)

पोलीस हवालदार नंदलाल खैरे हे तक्रारदार यांच्या घरी पंचनामा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी खैरे यांनी तक्रारदार यांचे शेजारी हे तक्रारदार व त्यांचे भावाच्या विरोधात विनयभंगाची तक्रार देणार असल्याचे सांगितले होते. विनयभंगाची तक्रार न घेता किरकोळ तक्रार घेऊन प्रकरण मिटवुन घेण्याच्या मोबदल्यात खैरे यांनी 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी अहमदनगर एसीबी कार्य़ालयात पोलीस हवालदार नंदलाल खैरे हे लाच मागत असल्याची तक्रार केली.

त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी 26 जुलै 2023 रोजी पंचासमक्ष पडताळणी केली. त्यावेळी पोलीस हवालदार खैरे
यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे 30 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 10 हजार रुपये लाचेची
मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती. पोलीस हवालदार खैरे यांच्यावर लाचेची मागणी केल्या
प्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी,
वाचक पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर एसीबीचे पोलीस उप अधीक्षक प्रवीण लोखंडे,
पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस हवालदार संतोष शिंदे, पोलिस नाईक विजय गंगुल,
रमेश चौधरी, पोलीस अंमलदार वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, रवींद्र निमसे, सचिन सुद्रुक,
चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल हारून शेख, दशरथ लाड यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar Speech In NCP Mahila Melava | महिलांच्या प्रश्नावर शरद पवार आक्रमक, रस्यावर उतरण्याचे आवाहन करत म्हणाले – ‘केसेस टाकल्या तरी…’

Pune Crime News | तडीपार आरोपीला चंदननगर पोलिसांकडून पिस्तुलासह अटक