Pune Crime News | तडीपार आरोपीला चंदननगर पोलिसांकडून पिस्तुलासह अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | येरवडा पोलीस ठाण्यातील (Yerwada Police Station) तडीपार आरोपीला चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police Station) अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्टल जप्त केले आहे. पोलिसांनी ही कारवाई मंगळवारी (दि.10) नदीपात्रातील रोडवर केली. रोहित राजु धाडवे Rohit Raju Dhadve (वय-22 रा. लक्ष्मीनगर, गेनबा शाळेसमोर, येरवडा सध्या रा. संघर्ष चौक, चंदननगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune Crime News)

चंदननगर पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अंमलदार श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव यांना माहिती मिळाली की, येरवडा पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील व तडीपार आरोपी राहुल धाडवे हा रिव्हर डेल सोसायटी नदीपात्रातील रोडवर पिस्टल घेऊन फिरत आहे. त्यानुसार पोलीस त्या ठिकाणी गेले असता आरोपी एका झाडाखाली थांबला होता. पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता पॅन्टमध्ये पिस्टल आढळून आले. (Pune Crime News)

आरोपी येरवडा पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याला पोलीस उपायुक्त परिमंडळ चार यांनी जुलै 2023
मध्ये पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. त्याच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात
आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पुर्व विभाग
रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ-4 शशिकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या
सुचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक गुन्हे मनिषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत माने, पोलीस अंमलदार गणेश हाडंगर, शिवाजी धांडे, श्रीकांत शेंडे, सचिन रणदिवे,
अविनाश संकपाळ, सुभाष आव्हाड, महेश नाणेकर, सुहास निगडे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, शेखर शिंदे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar Speech In NCP Mahila Melava | महिलांच्या प्रश्नावर शरद पवार आक्रमक, रस्यावर उतरण्याचे आवाहन करत म्हणाले – ‘केसेस टाकल्या तरी…’