ACB Trap News | SRA अधिकाऱ्यांना उशिरा पोलीस बंदोबस्त पुरवण्यासाठी बिल्डरकडे 20 लाखांची मागणी, लाचेची मागणी करणारा पोलिस शिपाई ‘गोत्यात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एस.आर.ए.च्या अधिकाऱ्यांना (S.R.A Officer) वीस ते पंचवीस दिवस उशिरा पोलीस बंदोबस्त (Police Security) पुरविण्यासाठी बिल्डरकडे 20 लाखांची लाच मागितल्या (Demanding a Bribe) प्रकरणी आर.ए.के. मार्ग पोलीस ठाण्यातील (R.A.K. Marg Police Station) पोलीस शिपायावर (Police Constable) मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) गुन्हा दाखल केला आहे. मंगेश नाना भोपळे (Mangesh Nana Bhopale) असे गुन्हा (FIR) दाखल केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. एसीबीने (ACB Trap News) ही कारवाई शुक्रवारी (दि.21) केली.

याबाबत बांधकाम व्यावसायिक फिरोज उस्मान टिनवाला Builder Feroze Usman Tinwala (रा. परेड रोड, मुंबई) यांनी मुंबई लालचुपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB Trap News) 5 जुलै 2023 रोजी तक्रार अर्ज केला होता. तक्रारदार फिरोज टिनवाला हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांची मयुर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स (Mayur Builders & Developers) नावाची बांधकाम व्यवसायाची फर्म आहे. या फर्मच्या माध्यमातून आदर्श नगर विकास सोसायटी (Adarsh Nagar Vikas Society), आर.ए.के. मार्ग वडाळा पश्चिम येथील झोपडपट्टी विकसित (Slum Development) करण्याचे काम सुरु आहे.

फिरोज टिनवाला यांच्या कंपनीने केलेल्या बांधकामाध्ये बेकायदेशीर राहत असलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी तहसीलदार एस.आर.ए. मुंबई यांनी आदेश दिले होते. तसेच यासाठी पोलीस बंदोबस्त पुरवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार टिनवाला हे आर.ए.के मार्ग पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निंबाळकर (Senior PI Nimbalkar), पोलीस शिपाई महेश तसेच भोपळे यांची भेट घेतली. टिनवाला यांनी या ठिकाणी सोसायटीच्या बांधकामाकरिता आलेली पाच ते सहा कुटुंब कामगार व कंत्राटदार राहत असल्याचे सांगितले.

यानंतर पोलीस शिपाई मंगेश भोपळे यांनी टिनवाला यांना
5 जुलै 2023 रोजी मोबाईलवर संपर्क साधला. एस.आर.ए.च्या
अधिकारी यांना वीस ते पंचवीस दिवस उशारी पोलीस बंदोबस्त
पुरविण्यासाठी 20 लाख रुपये लाचेची मागणी भोपळे यांनी केली. याबाबत टिनवाला यांनी मुंबई एसीबी (Mumbai ACB Trap News) कार्य़ालयात अर्ज करुन याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली.

टिनवाला यांनी दिलेल्या तक्रार अर्जावर मुंबई एसीबीचे
पोलीस निरीक्षक शहानवाज मुल्ला (PI Shahnawaz Mulla)
यांनी चौकशी केली. चौकशी दरम्यान पोलीस शिपाी मंगेश
नाना भोपळे यांनी तक्रारदार टिनवाला यांच्याकडे एस.आर.ए.
अधिकारी यांना पोलीस बंदोबस्त उशिरा पुरविण्याकरता
20 लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर पोलीस निरीक्षक मुल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन
पोलीस शिपाई मंगेश भोपळे याच्यावर आर.ए.के.
मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nagraj Manjule | नागराज मंजुळे यांचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या
भेटीला; करण्यात आले पोस्टर आऊट