ACB Trap News | लाचेची रक्कम घेऊन पळून जाताना पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | अपहरणाच्या (Kidnapping) गुन्ह्यात जामीन (Bail) मिळवून देण्यासाठी तसेच गुन्ह्यात वापरलेली गाडी परत करण्यासाठी 15 हजार रुपये लाचेची मागणी (Demanding Bribe) करुन 10 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील (Shivaji Nagar Police Station) पोलीस उपनिरीक्षक (PSI) आणि पोलीस हवालदार (Police Constable) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर पळून जात असताना एसीबीच्या पथकाने (ACB Trap News) दोघांचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी (दि.22) पोलीस ठाण्याच्या परिसरात करण्यात आली. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पोलीस उपनिरीक्षक (Police Sub-Inspector) लक्ष्मण कनलाल कीर्तने Laxman Kanlal Kirtane (वय- 34), पोलीस हवालदार रणजीत भगवान पवार Ranjit Bhagwan Pawar (वय- 42) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी येथे राहणाऱ्या 44 वर्षाच्या व्यक्तीने बीड एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार दिली आहे.

तक्रारदार यांच्या मुलावर बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा (FIR) दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये आरोपीला पोलीस स्टेशन मध्ये जामीन देण्यासाठी व गुन्ह्यात वापरलेले वाहन सोडण्यासाठी पंधरा हजार रुपयाची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी बीड लचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Beed ACB Trap News) तक्रार केली.

ACB Trap News

एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने व पोलीस हवालदार रणजीत पवार
यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच पडताळणी दरम्यान अधिकचे तीन हजार रुपये असे एकूण
अठरा हजार लाचेची मागणी केली. पथकाने पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला.
आरोपींनी मागणी केलेल्या लाचेच्या रक्कमेपैकी आठ हजार रुपये दाखल गुन्ह्यातील सह आरोपी ड्रायव्हर यांच्याकडून घेतले.
तर उर्वरित दहा हजार रुपये तक्रारदार यांचेकडून लाच स्वीकाली. दरम्यान आरोपींना एसीबीने सापळा रचल्याचे समजात
ते लाचेची रक्कम घेऊन मोटारसायकलवर पळून गेले. एसबीच्या पोलिसांनी दोघांचा पाठलाग करुन लाच रकमेसह
रंगेहात पकडले. त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole), अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे
(Addl SP Vishal Khambe), पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे (DySP Shankar Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड (PI Gulab Bachevad), पोलीस निरीक्षक यूनुस शेख (PI Yunus Shaikh)
पोलीस अंमलदार गिराम, सांगळे, गारदे, खरसाडे, गवळी, राठोड, चालक मेहेत्रे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Big relief for IPS Rashmi Shukla, case related disclosure of confidential report closed