ACB Trap News | 7 हजार रुपयांची लाच घेताना महावितरण कंपनीचा कार्यकारी अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाइन – राहते घराचे जवळ असलेला इलेक्ट्रिक पोल बदली (Electric Pole) करण्याकरिता व नवीन इलेक्ट्रिक पोल बसविण्यासाठी 7 हजार लाच स्वीकारणाऱ्या (Accepting Bribe) गोरेगाव विभागातील महावितरणचे (Mahavitaran) कार्यकारी अभियंत्याला (Executive Engineer) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (ACB Trap News) रंगेहाथ पकडले आहे. गणेश तुकाराम पाचपोहे Ganesh Tukaram Pachpohe (वय 55) असे लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. रायगड लाच लुचपत पथकाने (ACB Trap News) ही कारवाई केली आहे.

तक्रारदार यांचे गोरेगाव येथे घर आहे. घराच्या जवळ महावितरण विभागाचा इलेक्ट्रिक पोल आहे. हा पोल हलवून त्याठिकाणी नवीन पोल बसविण्यासाठी तक्रारदार यांनी अर्ज केला होता. याबाबत आरोपी गणेश पाचपोहे यांना मंगळवारी (दि.18 जुलै) भेटून माहिती दिली. आरोपी पाचपोहे यांनी तक्रारदार यांच्याकडे या कामासाठी सात हजाराची मागणी केली. तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी रायगड लाचलुचपत विभाग अलिबाग (ACB Trap News) येथे येऊन तक्रार दाखल केली. तक्रारदार यांच्या तक्रारी नुसार लाच लुचपत पथकाने पडताळणी करून सापळा रचला. बुधवारी आरोपी गणेश पाचापोहे यांनी तक्रारदार यांच्याकडून सात हजार रुपये स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले.

ही कामगिरी पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाडावे (DySP Shashikant Padave), पोलीस निरिक्षक रणजीत गलांडे (Police Inspector Ranjit Galande), अरुण करकरे, विनोद जाधव, महेश पाटील, पोलीस हवालदार कौस्तुभ मगर, पोलीस हवालदार विवेक खंडागळे, पोलीस नाईक सचिन आटपाडकर यांच्या पथकाने केली.

Pune Crime News | पुणे-सातारा रोडवर दारु पिताना झालेल्या वादात पोटात चाकू खूपसून खूनाचा प्रयत्न

Supplementary Examination Postpone | आज शाळा बंद! दहावी आणि बारावीचे पुरवणी पेपर पुढे ढकलले

Petrol-Diesel Price Today | तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव किती? जाणून घ्या

Ajit Pawar Birthday | …म्हणून अजित पवारांनी जाहीर केला यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

Raigad Irshalgad Landslide: Death toll rises to 10, with several injured in landslide