Supplementary Examination Postpone | आज शाळा बंद! दहावी आणि बारावीचे पुरवणी पेपर पुढे ढकलले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Supplementary Examination Postpone | मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Maharashtra Rain) मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg) आणि पालघरमधील (Palghar) शाळांना आज (गुरूवार) सुट्टी (School Holidays) जाहीर करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये पावसाच्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे आदेश मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी प्रशासनाला दिले आहेत. राज्यातील काही ठिकाणी हवामान खात्याने (IMD) अतिवृष्टीचा इशारा दिल्याने 10 वी व 12 वीची आज होणारी ही पुरवणी परीक्षा (Supplementary Examination Postpone) पुढे ढकलण्यात आली आहे.

10 वी चे पुढे ढकलण्यात आलेले पेपर 2 ऑगस्ट रोजी होतील, तर 12 वीचे पेपर 11 ऑगस्ट रोजी (Supplementary Examination Postpone) होणार असल्याचे सांगण्यात येत आले आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये आजही मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. त्यामुळे लोकल सेवा (Local Services) आणि वाहतूक सेवावर (Transport Services) त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणून मुंबई, ठाणे आणि पालघरमधील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

परिस्थिती पाहून निर्णय घ्या; शिक्षण उपसंचालकांचे आदेश

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत निर्णय घ्यावा, असे निर्देश मुंबई शिक्षण उपसंचालकांनी (Mumbai Deputy Director of Education) शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत. आपल्या कार्यक्षेत्रातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी (Collector) यांना प्रदान करण्यात आले आहेत.

हवामान खात्याच्या (IMD) अंदाजावरून तसेच त्या त्या भागातील पावसाच्या सद्यस्थितीचा तसेच त्या अनुषंगाने
स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन आपल्या स्थानिक क्षेत्रातील शाळांना सक्षम प्राधिकरण यांच्या मान्यतेने सुट्टी
जाहीर करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना शिक्षण उपसंचालकांनी दिल्या आहेत.

Ajit Pawar | ‘ही दुर्घटना मन पिळवटून टाकणारी’; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला मंत्रालय नियंत्रण कक्षातून आढावा

Emergency Alert Service | सर्वांना आला दूरसंचार विभागाकडून आपत्कालीन अलर्ट; नेमका तो आहे तरी काय ?

Devendra Fadnavis | खालापूर इर्शाळगड दुर्घटना! मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत; जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार करणार – देवेंद्र फडणवीसांची माहिती

Maharashtra Rain Update | पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज