ACB Trap News | ग्रामपंचायत सदस्याकडून लाच घेताना पंचायत समितीतील दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना एसीबीकडून अटक

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीचे बिल काढण्यासाठी ग्रामपंचायत सदस्याकडून लाच घेणाऱ्या (Accepting Bribe) व लाचेची मागणी (Demanding a Bribe) करणाऱ्या भोकरदन पंचायत समितीतील (Bhokardan Panchayat Samiti) दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) सापळा रचून अटक (Arrest) केली. एका कर्मचाऱ्याने 7 हजार रुपये तर दुसऱ्या कर्मचाऱ्याने 3 हजार रुपयांची लाच मागितली होती. जालना एसीबीच्या (ACB Trap News) अधिकाऱ्यांनी ही कारवाई सोमवारी (दि.17) भोकरदन पंचायत समिती कार्यालयात केली.

 

भोकरदन पंचायत समिती मधील तांत्रिक सहायक Technical Assistant (कंत्राटी) प्रशांत रामेश्वर दहातोंडे Prashant Rameshwar Dahatonde (वय 39), संगणक परिचालक Computer Operator (कंत्राटी) सतीश रामचंद्र बुरंगे Satish Ramchandra Burange (वय 29) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत 40 वर्षाच्या व्यक्तीने जालना एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे.

 

तक्रारदार हे ग्रामपंचायत सदस्य आहेत. महाराष्ट्र रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत सार्वजनिक पाणी पुरवठा (Public Water Supply) करण्यासाठी विहीर मंजूर करण्यात आली होती. विहिरीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचे बिल मस्टर काढण्यासाठी प्रशांत दहातोंडे याने 7 हजार तर सतीश बुरंगे याने 3 हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदारांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी जालना एसीबीकडे (Jalna ACB Trap News) तक्रार दिली.

 

एसीबीच्या पथकाने सोमवारी पडताळणी केली असता दहातोंडे आणि बुरंगे
यांनी तक्रारदार यांच्याकडे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. सोमवारी भोकरदन पंचायत समिती
परिसरात सापळा लावला. त्यावेळी प्रशांत दहातोंडे याला तक्रारदार यांच्याकडून 7 हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. तर सतीश बुरंगे यांनी अंतिम बिलावर सही घेण्यासाठी तीन हजार रूपयांची मागणी केली. परंतु, ते स्वीकारले नाहीत. एकाने पैसे स्वीकारताच पथकाने कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणात भोकरदन पोलिस ठाण्यात (Bhokardan Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole),
अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe)
यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबी जालना पोलीस उपअधीक्षक किरण बिडवे (DySP Kiran Bidve)
पोलीस अंमलदार शिवाजी जमधडे, जावेद शेख, कृष्णा देठे, चालक प्रविण खंदारे यांच्या पथकाने केली.

 

Web Title : ACB Trap News | ACB arrested two contract employees of Panchayat Samiti for taking bribe from
Gram Panchayat member

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा