ACB Trap News | 15 हजाराची लाच घेताना वनरक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | 30 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 15 हजार रूपयाची लाच घेणार्‍या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड वनविभागातील एटापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील वनरक्षकास (ACB Trap On Forest Guard) अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने Anti Corruption Bureau Nagpur (Nagpur ACB) रंगेहाथ पकडले आहे. त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरूध्द एटापल्ली पोलिस स्टेशनमध्ये (Etapalli Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB Trap News)

 

धनिराम अंताराम पोरेटी Dhaniram Antaram Poretti (33) असे लाच घेणार्‍या वनरक्षकाचे नाव आहे (ACB Trap Gadchiroli). याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे रेतीचे वाहतूक करणारे दोन ट्रक्टर पकडून कोणतीही कारवाई न करता सोडून दिल्याचा मोबदला म्हणून 30000 लाच रक्कमेची मागणी (Gadchiroli Bribe Case) करून तडजोडीअंती 15000 लाच रक्कम तक्रारदाराकडून स्विकारतांना रंगेहाथ मिळून आल्याने ताब्यात घेण्यात आले आहे. (ACB Trap News)

नागपूर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर (Nagpur ACB SP Rahul Maknikar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले (Police Inspector Shridhar Bhosale), पोलिस हवालदार नथ्थु धोटे, पोलिस अंमलदार राजेश पद्मगिरवार, स्वप्निल बांबोळे, किशोर ठाकुर, संदिप उडान, संदीप घोरमोडे, चालक पोलिस हवालदार अंगडवार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :  ACB Trap News | Anti Corruption Bureau Nagpur Arrest Forest Guard Dhaniram Antaram Poretti
In Gadchiroli Etapalli Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा