Biporjoy Cyclone Update | ‘बिपरजॉय’मुळे राजस्थानमध्ये मुसळधार; 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवले

नवी दिल्ली : Biporjoy Cyclone Update | बिपरजॉय चक्रीवादळामुळे (Biporjoy Cyclone Update) गुजरातमधील (Gujarat) नऊ जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. राजस्थान (Rajasthan) आता चक्रीवादळाच्या निशाण्यावर आहे. राजस्थानमधील प्रशासन सध्या अलर्टवर आहे. या चक्रीवादळामुळे बाडमेर (Barmer) आणि जालोर (Jalore) जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासापासून बाडमेरमध्ये पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी तुंबले आहे.

 

बिपरजॉय चक्रीवादळामुळे (Biporjoy Cyclone Update) शनिवारी रात्रीपासून ताशी 45 ते 60 किमी वेगाने वारे वाहत आहेत. बाडमेर आणि जालोरमधील पाच हजार नागरिकांना खबरदारी म्हणून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. शनिवारी रात्रीपासून बखासरमध्ये सर्वप्रथम बिपरजॉयचा प्रभाव दिसून आला आहे. त्यानंतर शेवडा, बखासर, धनाळ, चौथण, धोरिमाण्णा येथे मुसळधार पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department-IMD) शनिवारी बारमेर जिल्ह्यात रेड अलर्ट (Red Alert) जारी केला होता. या पार्श्‍वभूमीवर एसडीआरएफची (SDRF) टीम तैनात करण्यात आली. प्रशासनाकडून लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

बाडमेर आणि जालोर मध्ये बिपरजॉय अधिक सक्रिय झाल्यामुळे झोपडपट्टी आणि कच्च्या घरात राहणाऱ्या 5 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. प्रशासनाकडून एसडीआरएफ, लष्करासह विविध मदत आणि बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस (Rain) आणि सोसाट्याचा वारा यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. ‘बिपरजॉय’मुळे राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले. 100 हून अधिक गावांचा वीजपुरवठा खंडित (Power Outage) झाला आहे.

 

‘या’ जिल्ह्यात जोरदार पाऊस –

राज्यातील सिरोही, पाली, जैसलमेर आणि जोधपूर जिल्ह्यात चक्रीवादळ बिपरजॉयचा (Biporjoy Cyclone) कमी प्रभाव दिसत आहे.
मात्र, शुक्रवारी दुपारपासून अधूनमधून पाऊस सुरू आहे. हा पाऊस शनिवारीही कायम होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,
राजस्थानच्या माउंट आबू मध्ये (Mount Abu) 210 मिमी, बाडमेरच्या सेवदामध्ये 136 मिमी, माउंट अबू तहसील मध्ये 135 मिमी,
जालोरच्या राणीवाडामध्ये 110 मिमी, चुरूच्या बिदासरामध्ये 76 मिमी, रेवदारमध्ये 68 मिमी,
सांचोर मध्ये 59 मिमी आणि पिनमध्ये 59 मिमी पाऊस पडला आहे.

 

 

Web Title :  Biporjoy Cyclone Update | heavy rains in rajasthan due to cyclone biparjoy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा