ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 16 हजाराच्या लाच प्रकरणी महिला कनिष्ठ सहाय्यकासह शिक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

अमरावती : पोलीसनामा – ACB Trap News | 16 हजार रूपयाच्या लाच प्रकरणी महिला कनिष्ठ सहाय्यकासह शिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात अडकले आहेत. त्यांच्याविरूध्द परतवाडा पोलिस स्टेशन Paratwada Police Station (जि. अमरावती – Amravati ACB Trap Case) येथे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (ACB Trap News)

दिपाली मधुकर सोळंके Deepali Madhukar Solanke (40, पद – कनिष्ठ सहाय्यक, कार्यालय – प्राथमिक आरोग्य केंद्र, सलोना, ता. चिखलदरा, जि. अमरावती. रा. क्वॉटर नंबर 4, पंचायत समिती वसाहत, दर्यापूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती – Amravati Crime News) आणि पांडुरंग धोंडूची पवार Pandurang Dhonduchi Pawar (40, पद – शिक्षण, जिल्हा परिषद शहापूर, ता. आकोट, जि. अकोला) यांच्याविरूध्द लाच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB Trap News)

याबाबत अधिक माहिती अशी की, दिपाली मधुकर सोळंके यांनी प्रोत्साहन भत्ता व प्रवास देयक बिल 1 लाख 50 हजार
रूपये मंजूर करून देण्याकरिता दहा टक्के म्हणजेच 16 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली.
तडजोडीअंती पांडुरंग धोंडूची पवार यांनी 16 हजार रूपये घेतले. आरोपींनी लोकसेवक पदाचा दुरूपयोग करून
स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता लाच रक्कमेची मागणी करून ती लाच घेतली.
त्यांच्याविरूध्द अमरावती जिल्हयातील परतवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

नागपूर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर (Nagpur ACB SP Rahul Maknikar),
अप्पर पोलिस अधीक्षक मधुकर गिते (Addl SP Madhukar Gite ) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस उप अधीक्षक योगिता चाफले (DySP Yogita Chafle), पोलिस निरीक्षक आशिष चौधरी
(PI Ashish Chowdhari) , पोलिस अनिल बहिरे, अमोल मेंघरे, सुरेंद्र शिरसाट आणि अस्मिता मल्लेलवार
आणि हर्षलता भरडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title :-  ACB Trap News | Anti-corruption department: A female junior assistant and a teacher in the net of anti-corruption in the case of bribe of 16 thousand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nitesh Rane On Sanjay Raut | संजय राऊत सर्वात मोठा लँड माफिया, धमकी देऊन जमीन विकत घेतली; भाजप आमदार नितेश राणेंचा गंभीर आरोप (व्हिडिओ)

Maharashtra Politics News | उद्धव ठाकरेंनी दंगल भडकवण्याचं प्लॅनिंग केलं होतं, भाजप आमदाराचा गंभीर आरोप (व्हिडिओ)

NCP MP Amol Kolhe Praised Ajit Pawar | अमोल कोल्हेंकडून अजित पवारांचे कौतुक; म्हणाले – ‘निवडणूक जिंकण्यासाठी अजित पवारांचा हात लागतोच…’