ACB Trap News | स्वत: साठी सोन्याचं बिस्कीट-पैसे आणि साहेबांसाठी लाचेची मागणी, लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जाचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी सोन्याचे बिस्कीट (Gold Biscuits), पैसे आणि साहेबांसाठी लाचेची मागणी करुन 8 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) सापळा रचून रंगेहाथ पकडले. मुजाहेद खुर्शीद शेख PSI Mujahid Khurshid Sheikh (वय 55, मुळ रा. भाग्य नगर अहमदपुर जि. लातूर सध्या रा. आयशा कॉलनी उदगीर जि. लातूर) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. एसीबीने (ACB Trap News) ही कारवाई बुधवारी (दि.5) उदगीर येथील गुलजार हॉटेल समोरील रोडवर केली.

 

याबाबत 50 वर्षीय व्यक्तीने लातूर एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे. मुजाहेद खुर्शीद शेख हे देवणी पोलीस ठाण्यात (Devani Police Station) पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. एसीबीच्या पथकाने मंगळवारी (दि.4) पडताळणी करुन बुधवारी सापळा कारवाई करुन शेख यांना लाच घेताना अटक केली.

 

यातील तक्रारदार यांनी प्रभाकर शिंदे यांच्या विरोधात देवणी पोलीस ठाण्यात काळया मातीच्या चोरी केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करणे बाबत तक्रार अर्ज केला आहे. या प्रकरणाचा तपास शेख यांच्याकडे आहे. तक्रारी अर्जात तक्रारदाराला कुठलाही अडथळा न येवू देता तक्रारदाराच्या बाजूने अर्ज निकाली काढल्याचा मोबदला, तसेच भविष्यात देखील तक्रारदारास प्रभाकर शिंदे यांचे कडून प्राप्त होणाऱ्या तक्रारीत मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी शेख यांनी सुरुवातीस सोन्याचं बिस्कीट आणि स्वतः साठी तीन हजार रुपये, तसेच साहेबांसाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती स्वतः साठी तीन हजार रुपये, साहेबांसाठी पाच हजार रुपये असे एकूण 8 हजार रुपये लाचेची मागणी शेख यांनी केली.

 

तक्रारदार यांनी लातूर एसीबीकडे (Latur ACB Trap) याबाबत तक्रार केली. पथकाने पडताळणी केली असता शेख यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे तक्रारदार शेख यांना गुलजार हॉटेल समोर रोडवर उदगीर येथे लाचेची मागणी केलेली रक्कम 8 हजार रुपये देण्यासाठी गेले. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना मुजाहेद शेख यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर उदगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

ही कारवाई नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक परिक्षेत्राचे (Nanded ACB) पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे (SP Dr. Rajkumar Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर एसीबीचे पोलीस उप अधीक्षक पंडीत रेजितवाड (DySP Pandit Rejitwad), पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर (PI Anwar Mujawar) आणि लातूर एसीबीच्या पथकाने केली.

 

Web Title : ACB Trap News | Demanding gold biscuit-money for self and bribe for boss, police sub-inspector arrested by ACB while accepting bribe

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Actor Mahesh Babu | महेश बाबूच्या पत्नीने त्यांच्या सांगण्यामुळे सोडले सिनेविश्व; त्याला हवी होती गृहिणी पत्नी

Pune Crime News | शहरात दहशत माजविणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांवर MPDA कारवाई; CP रितेश कुमार यांची आजपर्यंतची 23 वी कारवाई