Pune Crime News | शहरात दहशत माजविणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांवर MPDA कारवाई; CP रितेश कुमार यांची आजपर्यंतची 23 वी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरात दहशत माजवणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए – MPDA) कारवाई केली आहे. कारवाई करण्यात आलेल्या आरोपींना वेगवेगळ्या कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. (Pune Crime News) पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत शहरातील 23 गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए कारवाई केली आहे.

 

वनराज महेंद्र जाधव Vanraj Mahendra Jadhav (वय 20, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), महेश उर्फ दाद्या उर्फ रोहित कुंडलिक मोरे
Mahesh alias Dadya alias Rohit Kundalik More (वय 21, रा. वडगाव राजा गणपती मंदिरामागे, वडगाव बुद्रुक) अशी कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. मोरे याला एक वर्षांसाठी अमरावती कारागृहात (Amravati Jail) स्थानबद्ध करण्यात आले आहे. तर जाधवची रवानगी नागपूर कारागृहात (Nagpur Jail) करण्यात आली आहे. (Pune Crime News)

 

महेश मोरे विरुद्ध खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला, बेकायदा शस्त्र बाळगणे, मारहाण करणे अशा प्रकराचे 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत. मोरेच्या दहशतीमुळे नागरिक पोलिसांकडे तक्रार करण्यास धजावत नव्हते. त्याच्यावर एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे (Sinhagad Road Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Senior PI Abhay Mahajan), गुन्हे प्रतिबंधक शाखेच्या (P.C.B. Crime Branch) वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior PI Vaishali Chandgude) यांनी तयार केला होता. या प्रस्तावास पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मंजूरी दिली.

येरवडा भागातील लक्ष्मीनगर परिसरातील सराईत गुन्हेगार वनराज जाधव विरुद्ध खुनाचा प्रयत्न,
शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण, बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.
येरवडा पोलीस ठाण्याचे (Yerwada Police Station)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम (Senior PI Balkrishna Kadam)
यांनी त्याच्यावर एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला होता.
या प्रस्तावाला पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी मंजुरी देऊन त्याची रवानगी नागपूर कारागृहात करण्याचे आदेश दिले.

 

 

Web Title : Pune Crime News | MPDA action against 2 criminals terrorizing the city; CP Ritesh Kumar’s 23rd MPDA action till date

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा