ACB Trap News | लाच स्वीकारताना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचा जिल्हा व्यवस्थापक व कंत्राटी लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत (Mahatma Phule Backward Class Development Corporation) मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम बँक खात्यात जमा करण्यासाठी 15 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक (District Manager) व कंत्राटी लिपिकाला सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) सापळा रचून अटक केली. एसीबीच्या पथकाने ही कारवाई शुक्रवारी (दि.8) केली.

जिल्हा व्यवस्थापक महिंद्र मल्लिशा माने (वय-54), कंत्राटी लिपिक महेश श्रीमंत बनसोडे (वय-28) यांना लाच घेताना पकडण्यात आले. याबाबत 33 वर्षीय व्यक्तीने सोलापूर एसीबीकडे (Solapur ACB) तक्रार केली आहे. पथकाने 15 सप्टेंबर, 6 ऑक्टोबर आणि 8 डिसेंबर रोजी पडताळणी केली. महिंद्र माने याच्यावर सोलापूरचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. (ACB Trap News)

तक्रारदार यांची बहीण मूकबधिर आहे. त्यांच्या नावाने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ कार्यालय सोलापूर कार्यालयाकडून कुक्कुटपालन (Poultry व्यवसायाकरिता 5 लाख रुपये कर्ज मंजूर झाले होते. मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम तक्रारदार यांच्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी जिल्हा व्यवस्थापक महिंद्र माने व कंत्राटी कर्मचारी बनसोडे यांनी 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 15 हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदार यांनी एसीबी कार्यालयात तक्रार केली.

सोलापूर एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता मंजुर झालेल्या कर्जाची रक्कम तक्रारदार यांच्या बहिणीच्या
बँक खात्यात जमा करण्यासाठी माने व बनसोडे यांनी 20 हजार रुपये लाच मागून 15 हजार रुपये स्वीकारण्यास
सहमती दर्शवली. पथकाने शुक्रवारी सापळा रचला. कंत्राटी कर्मचारी बनसोडे याच्यामार्फत 15 हजार रुपये लाच
स्वीकारताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe), अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे
(Addl SP Sheetal Janve) यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार
(DySP Ganesh Kumbhar), पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक (PI Umakant Mahadik) सहाय्यक पोलीस फौजदार
चडचणकर, पोलीस अंमलदार कोळी, शिरीष कुमार सोनवणे, स्वामीराव जाधव, अतुल घाडगे, श्रीराम घुगे, राजू पवार,
चालक श्याम सुरवसे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | ‘24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही मिळाले, तर तिथून पुढे सरकारला पश्चाताप करावा लागेल’, जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा दिला इशारा

‘त्या’ महिलेचा खूनच ! न्यायवैद्यक अहवालावरून स्पष्ट, सव्वा तीन वर्षानंतर खुनाचा गुन्हा दाखल; पर्वती येथे आढळला होता मृतदेह

सीसीटीव्ही कॅमेरा तोडल्याचा जाब विचारल्याच्या रागातून दोन महिलांचा विनयभंग, वडकी परिसरातील घटना

Malaika Arora Bossy Look | मलाइका अरोराच्या बॉसी लूकने सोशल मीडियावर लावली आग, पाहा व्हायरल व्हिडिओ…

शिवीगाळ करुन महिलेसोबत गैरवर्तन, लोहगाव मधील कॅफेतील प्रकार