Manoj Jarange Patil | ‘24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही मिळाले, तर तिथून पुढे सरकारला पश्चाताप करावा लागेल’, जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा दिला इशारा

पोलीसनामा ऑनलाइन – मराठा समाजाचे आंदोलक आणि नेते म्हणून समोर आलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या दोन महिन्यांपासून आक्रमक भूमिका मांडत आहेत. मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन दोन टप्प्यांमध्ये पार पडल्यानंतर जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला (State Government) आरक्षणाबाबत विचार करण्यासाठी मुदत वाढवून दिली होती. येत्या 24 डिसेंबर पर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मुदतवाढ दिली असली तरी जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा मुद्दा जराही मागे पडू दिलेला नाही. आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी माध्यमांशी संवाद साधला असून राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही मिळाले, तर तिथून पुढे सरकारला पश्चाताप करावा लागेल अशा शब्दांमध्ये इशारा दिला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे, यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले, “सरकार आरक्षणाचा विषय किती गांभीर्याने घेत आहे, हे आम्हाला माहीत नाही. पण 24 डिसेंबर पर्यंत मराठा आरक्षण मिळणार हे मी शंभर टक्के सांगतो. आमच्यासाठी आमच्या मुलांचे भवितव्य महत्त्वाचे आहे. आणि आम्हीच मोठे केलेले नेते जर आमच्याविरोधात जायला लागले, तर त्यांना पायाखाली तुडवायला आम्हाला वेळ नाही लागणार. महाराष्ट्रातला मराठा काय आहे? हे त्यांना आता लक्षात येईल. सरकार हा विषय प्रामुख्याने का घेत नाही, याच्यावर आमचे बारकाईने लक्ष आहे. गुन्हे मागे घेण्याबाबत आम्हाला काय आश्वासन दिले, आरक्षणासाठी काय आश्वासन दिले, यावर आमचे संपूर्ण लक्ष आहे.” असे मत मनोज जरांगे पाटील यांनी मांडले.

पुढे जरांगे पाटील म्हणाले, “माझा मराठा (Maratha) समाज गरीब असला, शेतात राबणारा असला तरी त्याचे सरकार, लोकप्रतिनिधींवर बारकाईने लक्ष आहे. एकदा फक्त 24 डिसेंबरची मुदत होऊन जाऊ द्या. मग पुढे महाराष्ट्रातला मराठा समाज काय आहे? हे त्यांना दाखवून दे. सरकारने काय समजायचे ते समजावे. आमच्या संयमाची परिक्षा घेऊ नये. आमचे आंदोलन शांततेतच होईल, पण सरकारला पश्चाताप करावा लागेल, अशी काहीतरी कृती करू” असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.

तसेच सध्या नागपूरमध्ये (Nagpur) सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये (Winter Session 2023) उपमुख्यमंत्री
तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठीचार्ज बद्दल भूमिका
मांडली. यावेळी आंदोलकांपेक्षा पोलीस जास्त जखमी झाले आणि त्यांनी स्वरक्षणासाठी हा लाठीचार्ज केला असे मत
फडणवीसांनी मांडले. याबाबत प्रश्न विचारला असता जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे उत्तर दिले.
जरांगे पाटील म्हणाले, “ते त्यांच्या मूळ भूमिकेवर येतील. ते जर मूळ भूमिकेवर नाही आले, तर त्यांना मराठा काय
आणि महाराष्ट्र काय हे लक्षात येईल. कुणाचे तरी ऐकून फडणवीस यांनी भूमिका बदलली, याचा त्यांना नंतर पश्चाताप होईल. आम्ही दूध का दूध, पाणी का पाणी करू. दोन तीन दिवस वाट पाहू. फडणवीस यांना मराठे पुन्हा एकदा उघडे पाडणार, ते खोटे बोलले आहेत. त्यांना रोषाला सामोरे जावे लागणार. त्यांनी आम्हाला समजून घ्यावे. फडणवीस यांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता मराठ्यांचा विचार करावा. जर आमची गरज नसेल तर पुढे आम्ही कोण आहोत? हे दाखवून देऊ” अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांसमोर दिली.

मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यामधील वाद देखील अनेकदा विकोपाला गेला.
आज छगन भुजबळ यांची इंदापूर येथे सभा होत आहे याबद्दल जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा आंदोलक जरांगे पाटील म्हणाले, “त्यांना सभा घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण त्यांनी जातीय तेढ निर्माण करू नये.
भुजबळ हे घटनात्मक पदावर बसलेले आहेत. ते ज्येष्ठ नेते देखील आहेत. त्यांच्यासारख्या नेत्याने दंगलीची भाषा,
कुऱ्हाडी-कोयत्याची भाषा करून राज्यामध्ये जातीय तेढ निर्माण करू नये. मराठा आरक्षणावर त्यांनी काहीही बोलू नये.
नाहीतर पुढे त्यांना दाखवून देऊ.” या शब्दांमध्ये मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी छगन भुजबळ
यांच्या सभेवर मत व्यक्त केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

‘त्या’ महिलेचा खूनच ! न्यायवैद्यक अहवालावरून स्पष्ट, सव्वा तीन वर्षानंतर खुनाचा गुन्हा दाखल; पर्वती येथे आढळला होता मृतदेह

सीसीटीव्ही कॅमेरा तोडल्याचा जाब विचारल्याच्या रागातून दोन महिलांचा विनयभंग, वडकी परिसरातील घटना

Malaika Arora Bossy Look | मलाइका अरोराच्या बॉसी लूकने सोशल मीडियावर लावली आग, पाहा व्हायरल व्हिडिओ…

शिवीगाळ करुन महिलेसोबत गैरवर्तन, लोहगाव मधील कॅफेतील प्रकार