ACB Trap News | 10 हजार रुपये लाच घेताना विस्तार अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | कृषी सेवा केंद्र (Agricultural Service Centre) दुकानावर कारवाई न करता सहकार्य करण्यासाठी दहा हजार रुपये लाच (Accepting Bribe) स्वीकारताना बिड जिल्ह्यातील पाटोदा पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) सापळा रचून रंगेहात पकडले. जयेश मुकुंद भुतपल्ले Jayesh Mukund Bhutpalle (वय 36) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई बुधवारी (दि.4) करण्यात आली. (ACB Trap News)

याबाबत 53 वर्षाच्या व्यक्तीने उस्मानाबाद एसीबीकडे (Osmanabad ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार यांचे कृषी सेवा केंद्र दुकान आहे. दुकानातील औषधांचे सॅम्पल न घेण्यासाठी व वर्षभराच्या सीजनमध्ये कारवाई न करता सहकार्य करण्यासाठी आरोपी जयेश भुतपल्ले यांनी 6 सप्टेंबर रोजी 10 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

एसबीच्या पथकाने पंचांसमक्ष पडताळणी केली असता जयेश भुतपल्ले याने तक्रारदार यांच्याकडे 10 हजार रुपये
लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज (बुधवार) सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची
रक्कम स्वीकारताना भुतपल्ले याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्यावर पाटोदा पोलीस ठाण्यात
(Patoda Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB Trap News)

ही कारवाई औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole), उस्मानाबाद एसीबीचे
सिध्दाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम (PI Nanasaheb Kadam),
पोलीस अंमलदार विशाल डोके, विष्णू बेळे, सिद्धेशर तावस्कर, अविनाश आचार्य, दत्तात्रेय करडे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Crisis | निवडणूक आयोगाने एकांगी निर्णय घेतला, शरद पवार गटाचा आरोप; पुढील सुनावणी ‘या’ तारखेला

Pune Crime News | ससूनमधील वॉर्ड नंबर 16 म्हणजे श्रीमंत गुन्हेगारांचे दुसरे घर, अनिल भोसले, रुपेश मारणेसह अनेक अट्टल गुन्हेगारांचा ससूनमध्ये मुक्काम