ACB Trap News | पोलीस कस्टडीत न मारण्यासाठी लाचेची मागणी, सहायक पोलीस निरीक्षकासह (API) पोलीस शिपायावर एसीबीकडून FIR

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलीस कस्टीत (Police Custody) मारहाण (Beating) करणार नाही तसेच 307 कलम वाढवण्याची भीती दाखवून 50 हजार रुपये लाचेची मागणी (Demanding Bribe) करणाऱ्या येवला शहर पोलीस ठाण्यातील (Yeola City Police Station) सहायक पोलीस निरीक्षक (API) व पोलीस शिपाई (Police Constable) यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) गुन्हा दाखल केला आहे. एसीबीच्या पथकाने (ACB Trap News) दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे (API Kunal Sapkale), पोलीस शिपाई सतीश बागुल (Police Constable Satish Bagul) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत येवला येथील 24 वर्षाच्या व्यक्तीने नाशिक एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे.

कुणाल सपकाळे आणि सतीश बागुल हे येवला शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. यातील तक्रारदार यांच्या भावाच्या नावावर येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात भावाला पोलीस कस्टडीमध्ये मारहाण करणार नाही तसेच या गुनह्यात 307 वाढीव कलम लावण्याची भीती घालून सहायक पोलीस निरीक्षक (Assistant Police Inspector) कुणाल सपकाळे व पोलीस शिपाई सतीश बागुल यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी केली.

तसेच एपीआय कुणाल सपकाळे यांनी तक्रारदार यांच्या घरी जाऊन त्यांचा जबरदस्तीने मोबाईल हिसकावून घेतला.
सपकाळे यांनी तक्रारदार यांच्या मोबाईलमधील मोबाईल डिटेल्स हिस्ट्री डिलीट केली.
याबाबत तक्रारदार यांनी नाशिक एसीबीकडे (Nashik ACB Trap News) तक्रार केली.
पथकाने पडतळणी करुन एपीआय सपकाळे व पोलीस शिपाई बागुल यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम (Prevention of Corruption Act) कलम 7, 7(a) तसेच आयपीसी 166, 201, 452 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी (Addl SP Madhav Reddy)
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक विश्वजीत जाधव (DySP Vishwajit Jadhav),
पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे (PI Parashuram Kamble), पोलीस अंमलदार प्रकाश डोंगरे, प्रणय इंगळे,
नितिन कराड, परसराम जाधव यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Power of Investing | लवकर करोडपती बनायचंय?, गुंतवणुकीच्या या तीन सवयी फॉलो केल्याने पूर्ण होईल स्वप्न