ACB Trap News | दोन लाखांची लाच मागणाऱ्या शिक्षकाविरुद्ध एसीबीकडून FIR

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – शालार्थ आयडीचे काम केल्याच्या मोबदल्यात आणि एका शिक्षकाचे शालार्थ आयडीचे (School ID) काम करुन देण्यासाठी दोन लाख रुपये लाचेची मागणी (Demanding a Tribe) करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध (Teacher) सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सचिन प्रकाश उकिरडे Sachin Prakash Ukirde (शिक्षक, लोकसेवा विद्यालय, आगळगाव, ता. बार्शी) असे एसीबीने (ACB Trap News) गुन्हा (FIR) दाखल केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

सचिन उकिरडे याने विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे (Divisional Deputy Director of Education, Pune) यांच्याशी तक्रारदार यांच्या शिक्षक संघटनेशी संबंधित दोन शिक्षकांचे शालार्थ आयडीच्या अनुषंगाने बोलणे झाले. औदुंबर उकिरडे (Audumbar Ukirde) यांच्याकरिता म्हणून तक्रारदार यांचे शिक्षक संघटनेतील एका शिक्षकांचे शालार्थ आयडीचे केलेल्या कामाचा मोबदला व एका शिक्षकाचे शालार्थ आयडीचे काम करण्यासाठी म्हणून प्रत्येकी एक लाख रुपये असे दोन लाख रुपये लाचेची मागणी केली.

औदुंबर उकिरडे यांच्यावर त्यांनी पदिय नात्याने आवश्यक असलेले काम करण्याबद्दल प्रभाव टाकण्यासाठी अयोग्यरित्या बेकायदेशीर पारितोषण स्वीकारण्याचा प्रयत्न केला असल्याने शिक्षक सचिन उकिरडे याच्याविरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात (Barshi City Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा (Prevention of Corruption Act) कलम 7 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB Trap News)

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Pune ACB) पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे (Addl SP Sheetal Janve) यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर एसीबी
(Solapur ACB Trap News) पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार (DySP Ganesh Kumhar),
पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक (PI Umakant Mahadik), पोलीस अंमलदार सायबण्णा कोळी, शिरीषकुमार सोनवणे,
श्रीराम घुगे, रवि हाटखिळे, सन्नके, गायकवाड, शाम सुरवसे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

15 August Rashifal : मेष आणि वृषभसह या चार राशीचे भाग्य ग्रह राहतील प्रबळ, वाचा दैनिक भविष्य

Expanding Access to Affordable Medicines: Government Aims to Increase ‘Jan Aushadhi Kendra’ Count to 25,000

Indian Sikh Community Raises Concerns: Khalistan Issue Overshadowing Tradition of Hospitality and Philanthropy