ACB Trap News | लाच घेताना सिडकोचे महाव्यवस्थापक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – इस्टेट एजंट कडून दहा हजार रुपयांची लाच घेताना सिडकोच्या (CIDCO) अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) कारवाई केली आहे. नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) मंगळवारी (दि.29) दुपारी तीनच्या सुमारास सापळा रचून ही कारवाई केली. जगदीश लक्ष्मणराव राठोड Jagdish Laxmanrao Rathod (वय 53) असे लाच घेताना (Accepting Bribe) पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. घराच्या फर्स्ट पार्टी डीड ऑफ अपार्टमेंटवर (First Party Deed of Apartment) सही करण्यासाठी राठोड यांनी पैशांची मागणी केली होती.

जगदीश राठोड हे प्रशासन विभागाचे (Administration Department) महाव्यवस्थापक (General Manager) आहेत. त्यांच्याकडे ऐरोली विभागाचा देखील अतिरिक्त कार्यभार आहे. याबाबत एका इस्टेट एजंटने (Estate Agent) नवी मुंबई एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे. राठोड यांनी लाचेची रक्कम सिडको कार्यालय CBD बेलापूर येथील सहाव्या माळ्यावरील प्रशासन विभागाच्या कार्यालयात स्वीकारली.

तक्रारदार हे इस्टेट एजंट असून त्यांच्याकडील ऐरोली येथील सदनिकेचे फर्स्ट पार्टी डीड ऑफ अपार्टमेंट
कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी जगदीश राठोड यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी मंगळवारी नवी मुंबई एसीबी (Navi Mumbai ACB Trap News) कार्यालयात तक्रार केली. त्याअनुषंगाने शासकीय पंचासमक्ष करण्यात आलेल्या लाचेच्या सत्यता पडताळणी दरम्यान जगदीश राठोड यांनी 10 हजार रुपये लाचेची मागणी केली. लाचेची 10 हजार रुपयांची रक्कम सिडको कार्यालय CBD बेलापूर येथील सहाव्या माळ्यावरील प्रशासन विभागाचे कार्यालयात पंचासमक्ष दुपारी तीनच्या सुमारास स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई ठाणे परिक्षेत्र पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे (SP Sunil Lokhande),
अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर (Addl SP Anil Gherdikar)
यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई एसीबी पोलीस उपअधीक्षक शिवराज म्हेत्रे (DySP Shivraj Mhetre)
पोलीस अंमलदार पवार, गायकवाड, ताम्हाणेकर, नाईक, चव्हाण, चाळके यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | … तर राजकारणात सक्रिय व्हायला तयार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव जय पवारांचे राजकारणात येण्याचे संकेत

NCP | राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे, पक्षातील फुटीनंतर शरद पवार गटाकडून नियुक्ती