ACB Trap News |   कोर्टाच्या आदेशानुसार जन्माची नोंद करण्यासाठी 1400 रुपये लाच घेताना ग्रामसेवक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News |   कोर्टाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीच्या दप्तरात जन्माची नोंद (Birth Record) करण्यासाठी 1 हजार 400 रुपयांची लाच स्वीकारताना (Accepting Bribe) शिरपूर तालुक्यातील जामन्यापाडा येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. गुलाब रामदास चौधरी  Gulab Ramdas Chaudhary (वय 44, रा बालाजी नगर, घर क 21, सोनगीर, ता. जि. धुळे) असे लाच घेताना (ACB Trap News)  पकडण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.  धुळे एसीबीच्या पथकाने (Dhule ACB Trap) ही कारवाई सोमवारी (दि. ) दुपारी जामन्यापाडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात केली.

व्यक्तीकडे लाचेची मागणी केली होती. याबाबत 20 वर्षीय व्यक्तीने धुळे एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे. तक्रारदार हे जामन्यापाडा येथील रहीवाशी आहेत. त्यांच्या आत्याचा जन्म 01मे 1968 मध्ये जामन्यापाडा येथे झाला आहे. तक्रारदार यांचे आजोबा अशिक्षित असल्याने त्यांच्या जन्माची नोंद केली गेली नव्हती. त्यांच्या जन्माची नोंद करुन मिळावी, यासाठी तक्रारदार यांच्या आत्याने शिरपुर येथील न्यायालयात (Shirpur Court) अर्ज दिला होता. 2022 मध्ये न्यायालयाने जन्माची नोंद करण्याचे आदेश पारित केले. त्याप्रमाणे तकारदार यांनी आत्याच्या जन्माची दप्तरी नोंद होणे करीता 16 मे रोजी ग्रामपंचायत कार्यालय, जामन्यापाडा येथे जावुन न्यायलयाच्या आदेशांची प्रत जोडून अर्ज केला.

त्यावेळी ग्रामसेवक चौधरी याने तक्रारदार यांना त्यांच्या आत्याच्या जन्माची दप्तरी नोंद घेवून जन्म दाखला देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे लेट फी म्हणून 1400 रूपये लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांनी याबाबत धुळे एसीबीकडे संपर्क साधून ग्रामसेवक गुलाब चौधरी विरुद्ध तक्रार दिली.
धुळे  एसीबीच्या पथकाने सोमवारी (दि.5) पडताळणी केली.
पडताळणी दरम्यान चौधरी याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार जामनपाडा येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसरात सापळा रचण्यात आला.
तक्रारदार यांच्याकडून 1 हजार 400 रुपये स्वीकारल्यानंतर पथकाने गुलाब चौधरीला ताब्यात घेतले. त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील (DySP Abhishek Patil), पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे
(PI Prakash Zodge), पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण (PI Manjit Singh Chavan),
पोलीस अंमलदार राजन कदम,  शरद काटके, भूषण खलाणेकर, संतोष पावरा भूषण शेटे, रामदास बारेला,
प्रशांत बागुल ,मकरंद पाटील,प्रविण पाटील,मपोशी गायत्री पाटील,रोहिणी पवार वनश्री बोरसे, चालक सुधीर मोरे,
जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली.

Web Title :  ACB Trap News Gram sevak arrested by ACB while taking bribe for birth registration

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanskruti Balgude | मला वाटलं माझ्यावर ॲसिड अटॅक वगैरे होतो की काय…? अभिनेत्री संस्कृती बालगुडेनी सांगितला ‘तो’ किस्सा

Pune ACB Trap Case | वाघोली येथील तलाठी कार्यालयात मदतनीस म्हणून काम करणार्‍या दोघांना अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक, 50 हजाराच्या लाचेची मागणी

Railway Underpass In Khadki Pune | खडकी येथील रेल्वे अंडरपासचे होणार रुंदीकरण पुणे महापालिका देणार 25 कोटी रुपये

Pune Katraj Vikas Aghadi | कात्रजकरांच्या समस्या मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकार्‍यांसमवेत 8 जून रोजी कात्रज विकास आघाडीच्यावतीने जनता दरबाराचे आयोजन

NCP MLA Rohit Pawar | शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका होत असताना दिग्गज नेते गप्प का?, रोहित पवारांचा स्वपक्षीयांना सवाल