ACB Trap News | 31 हजाराची लाच घेताना पुण्यातील वैद्यमापन शास्त्र विभागातील सह नियंत्रक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – इस्लामपूर वैद्यमापन शास्त्र विभागातील (Department of Medicine) निरीक्षकाकडून (Inspector) 31 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) पुण्यातील वैद्यमापन शास्त्र विभागातील सह नियंत्रक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) सापळा रचून रंगेहाथ पकडले. डॉ. ललित बेनीराम हारोळे Dr. Lalit Beniram Harole (वय-55) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या क्लास वन अधिकाऱ्याचे (Class One Officer) नाव आहे. एसीबीच्या पथकाने (ACB Trap News) ही कारवाई सोमवारी (दि. 31) केली.

इस्लामपूर वैद्यमापन शास्त्र विभागातील निरीक्षक (वय- 54) यांनी पुणे एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे. तक्रारदार हे इस्लामपूर वैद्यमापन शास्त्र विभागात निरीक्षक म्हणून नेमणुकीस आहेत. तर डॉ. ललित हारोळे हे तक्रारदार यांचे विभागीय प्रमुख (Head of Department) आहेत. तक्रारदार यांच्या हद्दीत होणारी पडताळणी (Verification) व मुद्रांकण च्या (Stamping) बद्दल दरमहा 4 हजार रूपये हप्ता प्रत्येक निरीक्षक विभाग प्रमाणे मागणी केली.

तक्रारदार यांचे कडील 1 नियमीत व 3 अतिरिक्त कार्यभार असे 16 हजार रूपये व डायमंड शुगर वर्क कंपनीचे (Diamond Sugar Works Company) स्टोअर कॅलिब्रेशन (Store Calibration) तीन टॅकसाठी प्रत्येकी 5 प्रमाणे 15000 असे एकूण 31हजार रूपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत पुणे एसीबीकडे (Pune ACB Trap News) तक्रार केली. पथकाने पडताळणी केली असता डॉ. ललित हारोळे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. एसीबीच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून 31 हजार रुपये लाच घेताना डॉ. ललित हारोळे यांना रंगेहाथ पकडले.डॉ. ललित यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Pune ACB)
पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे (Addl SP Sheetal Janve)
यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर
(DySP Sudam Pachorkar), नितीन जाधव (Nitin Jadhav),
सहायक पोलीस उपनिरीक्षक मुकूंद आयाचीत (ASI Mukund Ayachit)
पोलीस अंमलदार रियाज शेख यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Financial Rules Changing | 1 ऑगस्टपासून बदलणार ‘हे’ महत्वाचे नियम,
थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम