ACB Trap News | लाच घेताना जीएसटी विभागातील कर निरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – जीएसटीची रक्कम मुदतीत भरली नसल्याने होणारी कारवाई टाळण्यासाठी कोल्हापूर जीएसटी विभागातील कर निरीक्षकाला (Tax Inspector) 10 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB Trap News) पथकाने रंगेहात पकडले. विशाल बाबू हापटे Vishal Babu Hapte (वय-35 रा. हातकणंगले) असे लाच घेताना पकडलेल्या जीएसटी अधिकाऱ्याचे नाव आहे. एसीबीच्या पथकाने (ACB Trap News) ही कारवाई कसबा बावडा येथील जीएसटी भवनमध्ये (Kolhapur GST Bhawan) मंगळवारी (दि.5) दुपारी केली.

याबाबत कोल्हापूर शहरातील हॉकी स्टेडिअम (Hockey Stadium) परिसरातील व्यावसायिकाने कोल्हापूर एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार दिली आहे. तक्रारदार यांचे हॉकी स्टेडिअम परिसरात टायर विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी त्यांची जीएसटीची रक्कम भरलेली नाही. याबद्दल कारवाई करण्याचे टाळण्यासाठी जीएसटी विभागातील कर निरीक्षक विशाल हापटे यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली.

तक्रारदार यांनी याबाबत कोल्हापूर एसीबीकडे (Kolhapur ACB Trap News) तक्रार केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पथकाने मंगळवारी दुपारी जीएसटी भवन येथे सापळा रचला.
तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम घेताना हापटे याला पथकाने रंगेहाथ पकडले.
या कारवाईमुळे जीएसटी विभागात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून हापटे यांची चौकशी केली जात आहे.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Pune ACB) पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे (Addl SP Sheetal Janve), अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी
(Addl SP Vijay Chaudhary) यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर एसीबीचे उपअधीक्षक सरदार नाळे
(DySP Sardar Nale) यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bachchu Kadu | बच्चू कडू यांनी बोलून दाखवली पंकजा मुंडेंसोबत युतीची इच्छा; राज्यात नवे राजकीय समीकरण?

Maratha Reservation | थोडी सबुरी ठेवावी लागले, सरकारचं शिष्टमंडळ जालन्यातील अंतरवाली सराटी गावात दाखल