ACB Trap News | लाच घेताना महावितरणच्या अभियंत्यासह लेखापाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | अनधिकृतपणे वीज वापर केल्याने झालेल्या दंडाची रक्कम कमी करण्यासाठी 36 हजार रुपयांची लाच घेताना (Accepting Bribe) महावितरणचे अतिरिक्त कार्य़कारी अभियंता (Mahavitraan Additional Executive Engineer) (क्लास वन) व सहायक लेखापाल (Assistant Accountant) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Kolhapur) रंगेहाथ पकडले आहे. एसीबीच्या पथकाने (ACB Trap News) ही कारवाई मंगळवारी (दि.17) दुपारच्या सुमारास महावितरणच्या स्टेशन रोडवरील मुख्य कार्यालयात केली.

अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुयोग दिनकर पाटणकर Suyog Dinkar Patankar (वय 47 रा. खासबाग मैदान जवळ, मंगळवार पेठ, कोल्हापूर मुळ रा.सोमवार पेठ, पन्हाळा, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर), सहायक लेखापाल रवींद्र बापुसो बिरनाळे Ravindra Bapuso Birnale (वय- 38 रा. आमराई रोड, शिक्षक कॉलनी, इचलकरंजी जि. कोल्हापूर) अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. याबाबत 45 वर्षाच्या व्यक्तीने कोल्हापूर एसीबी कार्यालयात तक्रार केली आहे.

तक्रारदार यांना महावितरण ने अनाधिकृतपणे वीज वापर केल्या प्रकरणी पाच वर्षाचे एकूण 1 लाख 22 हजार 678 रुपये दंड केला होता. दंडाची रक्कम कमी करून फक्त एका वर्षाचा दंड केला म्हणून सुयोग पाटणकर यांनी तक्रारदार यांच्याकडे 41 हजार रुपयांची मागणी केली. करून तडजोडीअंती 36 हजार रुपये मागणी केली. त्यानंतर पाटणकर यांनी लाचेची रक्कम आलोसे सहायक लेखापाल रवींद्र बिरनाळे यांच्याकडे देण्यास सांगितले. याबाबत तक्रारदार यांनी कोल्हापूर एसीबीकडे (Kolhapur ACB Trap News)तक्रार केली.

एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता पाटणकर यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर मंगळवारी सापळा रचण्यात आला. रवींद्र बिरनाळे यांना सुयोग पाटणकर यांच्या सांगण्यावरून
तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. आरोपी यांचेविरुद्ध इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe), अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी
(Addl SP Vijay Chaudhary) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सरदार नाळे (DySP Sardar Nale),
श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर, पोलीस अंमलदार विकास माने, रुपेश माने, मयूर देसाई, विष्णू गुरव
यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PSI Somnath Zende Suspended | एका रात्रीत करोडपती झालेले पीएसआय सोमनाथ झेंडे निलंबित

Lalit Patil Arrested | अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला चेन्नइतुन अटक

Pune Crime News | ॲप डाऊनलोड करणं पडलं महागात, बिबवेवाडीतील ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांकडून गंडा

Shivsena UBT Group on Supreme Court Hearing | ‘जोपर्यंत न्यायालयाचा दंडुका…’, कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना सुनावल्यानंतर ठाकरे गटाची प्रतिक्रिया