Pune Crime News | ॲप डाऊनलोड करणं पडलं महागात, बिबवेवाडीतील ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांकडून गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | भारत पेट्रोलियम ॲप डाऊनलोड (Bharat Petroleum App Download) करण्यास सांगून सायबर चोरट्यांना (Pune Cyber Crime) एका ज्येष्ठ नागरिकाची दीड लाखांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार डिसेंबर 2022 मध्ये ऑनलाइन घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत अनिल कृष्णराव जाधव (वय-60 रा. बिबवेवाडी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी 83970XXXXX, 77682XXXXX या मोबाईल धारकांवर आयपीसी 420 सह अ‍ॅयटी अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला.
त्यांच्या मोबाईलवर लिंक पाठवून भारत पेट्रोलियम नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.
या अ‍ॅपमध्ये ठराविक कालावधीसाठी पैसे गुंतवल्यास जास्त परतावा देण्याचे आमिष सायबर चोरट्यांनी फिर्यादी
यांना दाखवले. त्यानुसार फिर्यादी यांनी 1 लाख 40 हजार रुपये गुंतवले. त्यानंतर अ‍ॅप बंद करुन कोणताही परतावा न देता फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली. फिर्यादी यांनी केलेल्या अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे गिरीश दिघावकर (PI Girish Dighavkar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PSI Somnath Zende Suspended | एका रात्रीत करोडपती झालेले पीएसआय सोमनाथ झेंडे निलंबित

Lalit Patil Arrested | अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला चेन्नइतुन अटक