PSI Somnath Zende Suspended | एका रात्रीत करोडपती झालेले पीएसआय सोमनाथ झेंडे निलंबित

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील (Pimpri Chinchwad Police Commissionerate) करोडपती पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांचे अखेर निलंबन (PSI Somnath Zende Suspended) करण्यात आले आहे. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवण्याचा ठपका झेंडेंवर ठेवण्यात आला आहे. पण विभागीय चौकशीत त्यांना स्वत:चे म्हणणे मांडण्याची मुभा मिळणार आहे. क्रिकेट वल्ड कप मॅचवेळी (Cricket World Cup Match) झेंडेंनी ड्रीम 11 (Dream 11) या ऑनलाईन गेममध्ये (Online Game) स्वत:ची टीम लावली अन् त्यात दीड कोटी रुपये जिंकले. मात्र, करोडपती झालेल्या झेंडेंवर आता निलंबनाची (PSI Somnath Zende Suspended) कारवाई करण्यात आली आहे.

दीड कोटींची त्यांना लॉटरी लागल्यानं त्यांच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. याच आनंदाच्या भरात झेडेंनी वर्धीत माध्यमांना मुलाखती दिल्या. हीच चूक झेंडेंच्या अंगलट आली. पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे (IPS Vinay Kumar Chaubey) यांच्या आदेशानुसार गठित केलेल्या पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे (DCP Swapna Gore) यांच्या चौकशी समितीने चौकशी करुन सोमनाथ झेंडे यांच्यावर निलंबनाची (PSI Somnath Zende Suspended) कारवाई केली. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला, आता पुढं विभागीय चौकशी होईल त्यात त्यांना स्वतःच म्हणणं मांडता येणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, ड्रीम 11 या ऑनलाईन खेळावर काही राज्यात बंदी आहे ,
हा खेळ जोखमीचा असल्याने तो सट्टा ठरतो तर पोलिस कर्मचारी किंवा अधिकारी यांचे
आर्थिक उत्पंनाचे साधने कायदेशीर असावेत असा नियम आहे, याशिवाय कोणत्याही खेळ
प्रकारात भाग घेताना वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते ती परवानगी झेंडे यांनी घेतली नव्हती,
विशेष म्हणजे ऑन ड्युटी असे खेळ खेळणे गैर वर्तणुकीची कृती असल्याचा ठपका देखील झेंडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान विभागीय चौकशी साठी पुढील तपास पोलीस उपायुक्त बंगर (DCP Bangar)
यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती पोलीस दलातील जनसंपर्क अधिकारी सतीश माने यांनी दिलीय.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lalit Patil Arrested | अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला चेन्नइतुन अटक