ACB Trap On Police Havaldar | कोर्ट आवारात लाच घेताना पोलीस अ‍ॅन्टी करप्शच्या जाळ्यात

ADV

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap On Police Havaldar | समजोता (कॉमप्रमाइज) करुन देण्यासाठी दोन हजार रुपये लाच स्वीकारताना पोलीस हवालदाराला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Nashik ACB Trap) सापळा रचून अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि.24) मालेगाव कोर्ट (Malegaon Court) आवारात करण्यात आली. दिलीप बाजीराव निकम (Dilip Bajirao Nikam) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. (Nashik Bribe Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार दिलीप निकम हे मालेगाव तालुक्यातील पवारवाडी पोलीस ठाण्यात (Pawarwadi Police Station) कर्यरत आहेत. तक्रारदार हे शेती खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असून, तक्रारदार यांनी त्यांच्या मित्राला बहिणीच्या लग्नासाठी हातउसणे म्हणून दोन महिन्यांच्या बोलीवर 50 हजार रुपये दिले होते. दोन महिने पुर्ण होवूनही तक्रारदार यांचा मित्र हा वायद्या वर वायदे देऊनही पैसे देत नसल्याने त्यांच्यात हातापाई झाली होती. त्यामुळे तक्रारदार यांचा मित्र मंगळवारी (दि.23) पवारवाडी पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी गेला होता.(ACB Trap On Police Constable)

ADV

त्यावेळी तक्रारदार यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार न घेता समजोता करुन देऊन तक्रारदार यांचे हातउसवार पैसे मिळवून देण्यासाठी दिलीप निकम यांनी तक्रारदार यांच्या दाजींकडे पाच हजार रुपये लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार केली.

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता दिलीप पवार यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती तीन हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
त्यानुसार मालेगाव कोर्ट परिसरात एसीबीच्या पथकाने सापळा रचला.
तक्रारदार यांच्या दाजीकडून तीन हजार रुपयांची लच स्वीकारून त्यापैकी एक हजार रुपये तक्रारदार यांना परत केले.
एसीबीच्या पथकाने दोन हजार रुपये लाच घेताना पोलीस हवालदार दिलीप निकम यांना रंगेहाथ पकडले.
त्यांच्यावर छावणी पोलीस स्टेशन, मालेगांव शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक चौधरी, पोलीस शिपाई अनिल गंगोडे, पोलीस हवालदार पंकज पळशीकर,
चालक पोलीस हवालदार विनोद पवार यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांनी दिला मतदारांना शब्द, म्हणाले – ”पुणेकरांचे मतदान स्वरूप कर्ज, विकास कामांच्या रुपात व्याजासह फेडणार”

ACB Trap On Police Inspector | लाच घेताना पोलीस निरीक्षकाला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक, संतप्त जमावाची पोलीस गाडीवर दगडफेक

Amol Kolhe On Eknath Shinde | भुजबळांनी नकार दिल्याने, आढळराव पाटलांना उमेदवारी ! मुख्यमंत्र्यांना शिरुर मधून द्यायची होती, छगन भुजबळांना उमेदवारी; डॉ.अमोल कोल्हे यांचा गौप्यस्फोट (Video)