ACB Trap On PSI And Police Havaldar | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : रेप केस दाखल करण्याची धमकी देत 40 हजाराच्या लाचेची मागणी; पोलिस उपनिरीक्षकासह हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap On PSI And Police Havaldar | तक्रारदाराच्या विरोधात बलात्काराचा (Rape Case) गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्यांच्याकडे 40 हजार रूपयांच्या लाचेची मागणी (Demand Of Bribe) करून तडजोडीअंती 30 हजार रूपयोची लाच घेण्याचे मान्य करून त्यामधील 20 हजार रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या (Sindhudurg Police) वैभववाडी पोलिस स्टेशनमधील (Vaibhavwadi Police Station) पोलिस उपनिरीक्षक आणि पोलिस हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात अडकले आहेत. (ACB Trap On PSI And Police Havaldar)

पोलिस उपनिरीक्षक सुरज शिवाजी पाटील PSI Suraj Shivaji Patil (31) आणि पोलिस हवालदार मारूती संतराम साखरे Police Maruti Santram Sakhre (36) अशी अ‍ॅन्टी करप्शनची कारवाई झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षकासह पोलिस हवालदाराविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (Sindhudurg ACB Trap) कारवाई झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वैभववाडी पोलिस स्टेशनमध्ये कुसुर येथील आर्थिक देवाणघेवाणीवरून मारहाणीची तक्रार दाखल होती. चौकशीदरम्यान पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील (PSI Suraj Patil) आणि पोलिस हवालदार मारूती साखरे यांनी तक्रारदाराला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत थेट 40 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. (ACB Trap On PSI And Police Havaldar)

तडजोडीअंती 30 हजार रूपयाची लाच घेण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील आणि मारूती साखरे यांनी मान्य केले.
दरम्यान, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
तक्रारीची पडताळणी करण्यात आली. सरकारी पंचासमक्ष पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील आणि
पोलिस हवालदार मारूती सारखे यांनी लाच मागणी केल्यापैकी 20 हजार रूपये घेतले. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
(Sindhudurg Crime News)

अ‍ॅन्टी करप्शन पथकाचे पोलिस निरीक्षक शिवाजी पाटील (Police Inspector Shivaji Patil),
पोलिस अंमलदार पप्या रेवणकर, निलेश परब, रविकांत पालकर, जितेंद्र पेडणेकर, अजित खंडे, प्रथमेश पोतनीस,
भार्गव पाले, कांचन प्रभू यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title :-  ACB Trap On PSI And Police Havaldar | Anti-Corruption Bureau Maharashtra: Demanding a bribe of 40,000, threatening to file a rape case; Police sub-inspector Suraj Shivaji Patil and Police Havaldar Maruti Santram Sakhre arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | आरक्षणाचा मार्ग बंद झालेला नाही, गैरसमज करुन घेऊ नका – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (व्हिडिओ)

Maratha Reservation | ‘मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व दौरे रद्द करुन बोलावली मंत्रिमडंळाची बैठक’

Ajit Pawar | कोण संजय राऊत? उगाच अंगाला का लागावं? अजित पवारांचा टोला

Pune Crime news | पुणे क्राईम न्युज : शिवाजीनगर पोलीस स्टेशन – जंबो कोविड सेंटर – पीएमआरडीए | संजय राऊतचे यांचे निकटवर्ती सुजीत पाटकर यांच्यासह चौघांविरूध्द गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण