Ajit Pawar | कोण संजय राऊत? उगाच अंगाला का लागावं? अजित पवारांचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) जो काही निकाल आला, त्यासंदर्भात सरकारनं त्यांच्या विधी व न्याय खात्याला (Law and Justice Department) तज्ज्ञ लोकांना, विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन यावर तातडीने काय करता येईल याचा विचार केला पाहिजे, असं विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले आहे. कोणावर अन्याय होऊ नये याची खबरदारी घ्यावी, असेही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

अजित पवार (Ajit Pawar) पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. तुम्ही बोलल्यानंतरही संजय राऊत (Sanjay Raut) सल्ले देत आहेत, त्यांची मतं मांडत आहेत, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी कोण संजय राऊत असं म्हणत टोला लागवला. मी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं, कुणाच्या अंगाला का लागावं? मी आमचा पक्ष आणि आमच्यापुरतं बोललो होतो, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

खारघर प्रकरणी राज्यपालांना पत्र

खारघर प्रकरणी (Kharghar Case) मी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. सरकारनं त्यात मृतांचा आकडा घोषित केला आहे. निश्चित आकडा मिळत नाही. मात्र काही लोक दबक्या आवाजात त्या उष्माघातात तिकडे काही लोकांना काही गोष्टी मिळाल्या नाही असं म्हणतात. मी पोस्टमार्टमचा रिपोर्ट माहितीच्या अधिकारात मागवला आहे. पण काही म्हणतात जी संख्या सांगण्यात येत आहे त्यात तफावत आहे, असे ही अजित पवार यांनी सांगितले.

तेव्हा भूमिका स्पष्ट करु…

फेब्रुवारी 2022 मध्ये राज्यात जिल्हा परिषद (Zilla Parishad), महापालिकेच्या निवडणुका
(Municipal Corporation Election) होणार होत्या.
तेव्हा अनेक इच्छुकांनी निरनिराळ्या पद्धतीनं आपलं मार्केटिंग केलं, जाहिरातबाजी केली, कामं केली, देवदर्शन केली,
झाली का निवडणूक? आता ते बिचारे कंटाळून गेले केव्हा निवडणूक लागते हा विचार करुन.
त्यामुळे जेव्हा निवडणूक लागेल त्यावेळी बसू, चर्चा करु, महाविकास आघाडीच्या संदर्भात काय भूमिका घ्यायची,
कोणाला उमदेवारी द्यायची, मागील महापालिकेच्या निवडणुकांमध्ये मविआच्या घटकपक्षांचे किती नगरसेवक आले
हे पाहून पुढील भूमिका ठरवू, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

Web Title :-  Ajit Pawar | ncp leader former deputy cm ajit pawar targets mp sanjay raut maharashtra politics commented on maratha reservation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | ‘काहीही झालं तरी महाराष्ट्रात भूकंप होणारच’, अंबादास दानवेंचं मोठं वक्तव्य

Pune Mahavitaran News | महावितरणच्या बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

MLA Amol Mitkari | ‘ही सैतानी साम्राज्याची सुरुवात, ज्या दिवशी…’, ‘त्या’ प्रकरणावरून अमोल मिटकरींचा सरकारला इशारा