ACB Trap On PSI News | 1 लाख दिले तर गुन्हा B फायनल करतो, अन्यथा फसवणूकीच्या गुन्ह्यात आरोपी करतो; पीएसआय अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap On PSI News | चोरीच्या गुन्हा बी फायनल करण्यासाठी पैशांची मागणी केल्यानंतर लाच (Nanded Bribe Case) दिली नाही तर फसवणूकीचा (Cheating Case) गुन्हा दाखल करून त्यामध्ये आरोपी करण्याची धमकी देवून सुरूवातीला 1 लाख रूपयाची मागणी करून तडजोडीअंती 30 हजार रूपयाची लाच घेणार्‍या पोलिस उपनिरीक्षकास (ACB Arrest Police Sub Inspector) अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने Anti Corruption Bureau Nanded (ACB Nanded) रंगेहाथ पकडले आहे. लाचेची रक्कम घेणार्‍या पोलिस उपनिरीक्षकाविरूध्द नांदेड येथील भाग्य नगर पोलिस स्टेशनमध्ये (Bhagyanagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. (ACB Trap On PSI News)

 

सुर्यकांत मारोती कांबळे PSI Suryakant Maroti Kamble (56, पद – पोलिस उपनिरीक्षक, सध्या नेमणूक – मनाठा पोलिस स्टेशन (Manatha Police Station), ता. हदगाव, जि. नांदेड. रा. मायादेवी नगर, शिव रोड, तरोडा (बु.), नांदेड, जि. नांदेड) असे लाच घेणार्‍या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. (ACB Trap On PSI News)

 

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचे पोकलेनच्या कॅबीनमधून 1,36,700 रूपये चोरीला गेले होते. त्याबाबत पो.स्टे. मनाठा, जि. नांदेड येथे दि. 18/05/2023 रोजी गुरनं 56/23 कलम 381 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल असून नमूद गुन्हयाचा तपास PSI सुर्यकांत मारोती कांबळे हे करीत होते. (Nanded ACB Trap)

नमूद गुन्हयातील चोरी गेलेले 1,36,700 रूपये हे चार दिवसानंतर पोकलेनच्या कॅबीनमध्येच मिळून आले. याबाबत तक्रारदार यांनी आरोपी लोकसेवक यांना सांगितले असता, त्यांनी आमचे काय असे म्हणून एक लाख रूपयाची मागणी केली. पैसे दिल्यास सदर गुन्हयात ‘ब’ वर्गात अखेर अहवाल पाठवितो. पैसे नाही दिले तर 420 भादंवि प्रमाणे तुम्हाला आरोपी करतो असे म्हणून लाचेची मागणी केली. (Nanded Crime News)

 

नमूद एक लाख रुपये ही लाच असल्याची तक्रारदार यांना खात्री झाल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे याबाबत तक्रार दिली.
त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड कडून लाच मागणी पडताळणी केली असता, पडताळणी दरम्यान तक्रारदार यांना लोकसेवक पोलीस उप निरीक्षक यांनी शासकीय पंचासमक्ष 50,000 रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 30,000 रूपये स्विकारण्याचे मान्य केले.
सापळा कारवाई दरम्यान लोकसेवक पोलीस उप निरिक्षक यांनी तडजोडीअंती ठरलेले 30,000/- रूपये लाचेची रक्कम शासकीय पंचासमक्ष स्विकारली.
यावरून आरोपी लोकसेवक पोलीस उप निरीक्षक सुर्यकांत कांबळे (PSI Suryakant Kamble) यांना ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक डॉ. राजकुमार शिंदे (Nanded ACB SP Dr. Rajkumar Shinde),
पोलिस उप अधीक्षक राजेंद्र पाटील (DySP Rajendra Patil)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरविंदकुमार हिंगोले (PI Arvindkumar Hingole),
पोलिस अंमलदार राजेश राठोड, सय्यद खदीर, ईश्वर जाधव
आणि चालक पोलिस मारोती सोनटक्के यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title :  ACB Trap On PSI News | Arrest Of PSI Suryakant Maroti Kamble In Bribe Case
Manatha Police Station Bhagyanagar Nanded

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा