Accident News | काळाचा घाला ! तीन आठवड्यातच मोडला संसार; नवोदित अभिनेत्रीचा अपघातात जागीच मृत्यू

इचलकरंजी : पोलीसनामा ऑनलाइन – इचलकरंजी (Ichalkaranji) येथील एका नवोदित अभिनेत्रीचा पतीसोबत दुचाकीवरून जात असताना अपघाती मृत्यू (Actress death in road accident) झाला. यामध्ये पती गंभीर झाला आहे. पायल सागर बागडी Payal Sagar Bagdi (वय 26) असे या अभिनेत्रींचे नाव आहे. तर पती दिग्दर्शक सागर राजाराम बागडी (Director Sagar Rajaram Bagdi) असे जखमीचे नाव आहे. दरम्यान आठवड्यापूर्वीच यांचा विवाह झाला होता. या अपघाताची (Road Accident) नोंद कुरळप पोलीस ठाण्यात (Kurlap police station) झाली आहे.

सैर चित्रपटात प्रमुख भूमिका
याबाबत अधिक माहिती अशी की, वाळवा तालुक्यातील ठाणेपुडे येथील रहिवासी असणाऱ्या सागर बागडी आणि इचलकरंजी येथील पायल शहा (sair marathi film fem actress payal shaha) हे दोघेही मराठी चित्रपट सृष्टीशी संबंधित होते. काही दिवसांपूर्वी सागर बागडी यांनी सैर नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. यामध्ये पायलनं मुख्य भूमिका साकारली होती. याचवेळी दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी 5 जुलै रोजी रजिस्टर आणि धार्मिक पद्धतीनं विवाह लावून दिला होता.

 

पायलचा जागीच मृत्यू

सोमवारी 26 जुलै रोजी सागर आणि पायल दोघंही आपल्या मित्राकडे घनवट मळ्यात जेवणासाठी गेले होते. पण रात्री उशीर झाल्याने दोघेही मित्राच्या घरीच थांबले. त्यानंतर मंगळवारी (दि.27) पहाटे दोघेही दुचाकीवरून घरी परतत होते. दरम्यान करंजवडे (Karanjwade) डोंगरवाडी रस्त्यावरील पळूस ओढ्यावर दुचाकी घसरली. त्यामुळे पायल रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका मोठ्या दगडावर जाऊन आदळल्या. तर सागर देखील गंभीर जखमी झाला असून त्याचा एक हात आणि एक पाय मोडला आहे. पायल यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

महिन्याभरातच संसार उद्ध्वस्त
जेवणासाठी गेल्यानंतर मित्राच्या घरी एक दिवस थांबून पहाटे पुन्हा घराकडे परतत असताना हा अपघात झाला.
अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी त्यांचा विवाह (Marriage) झाला होता.
पण या दुर्दैवी अपघातात पायल यांचा मृत्यू झाल्याने त्यांचा महिना भराच्या आतच संसार उद्ध्वस्त झाला.
या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर आणि मित्र परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title :- Accident News | sair marathi film fem actress payal shaha bagdi death in road accident sangli

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुण्यात PMPML बसच्या दरवाजातून पडून महिलेचा मृत्यू; चार महिन्यांनी पोलिसांकडून घटनेची ‘उकल’

Google द्वारे तुम्ही दरमहा घरबसल्या कमावू शकता 50 हजार रुपये, जाणून घ्या काय करावे?

Pune News | तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी 1015 कोटींचा निधी मंजूर ! न्हावरा ते चौफुला रस्त्यासाठीही 220 कोटी