परदेशातील भारतीयांनी घरी पाठवले 5.5 लाख कोटी रुपये, चीनला सुद्धा टाकलं मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विदेशातून पैसे पाठवण्याच्या बाबतीत भारतीय नागरिक सर्वात पुढे आहेत. 2018 मधील यूएनच्या रिपोर्ट नुसार भारतीयांनी जवळजवळ 5.5 लाख कोटी रुपये आपल्या घरी पाठवले आहेत. याबाबतीत चीनचा दुसरा क्रमांक लागतो. गेल्या काही वर्षांमध्ये सगळ्यात जास्त विदेशी धन 2018 मधेच मिळाले आहे.

संयुक्त राष्ट्र की संस्था इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन फॉर माइग्रेशन (आईओएम) ने दिलेल्या एका अहवालानुसार विदेशात एकूण 1.75 कोटी भारतीय नागरिक राहतात अशात प्रत्येक भारतीयांकडून 3.15 लाख रुपये आपल्या घरी पाठवण्यात आले आहे.या आधी 2017 मध्ये भारतला 65.3 अब्ज डॉलर आणि 2016 मध्ये 62.7 अब्ज डॉलर इतकी रक्कम मिळाली आहे.

जगात भारताचा हिस्सा 14 टक्के
अहवालात म्हणण्यात आले आहे की, विदेशातून येणाऱ्या पैशांपैकी भारताचा हिस्सा 14 टक्के आहे. यावेळी जगभरातील देशांमध्ये 689 अब्ज डॉलरचे विदेशी धन कमाववले. मिळालेल्या माहितीनुसार केरळमध्ये आलेल्या महापुरामुळे मदत पाठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात भारतात विदेशातून मदत म्हणून पैसे पाठवला गेला. 2010 ते 2015 या कालावधीमध्ये देशात मोठ्या प्रमाणावर विदेशी धन आले होते.

एफडीआय पेक्षा डबल पैसे पाठवले
भारताला विदेशांतून मिळालेला एकूण पैसा 2018 मध्ये आलेल्या प्रत्यक्ष परदेशी गुंतवणुकीच्या दुप्पट किमतींपेक्षाही अधिक होता. 2018 मध्ये भारतातील एकूण एफडीआय 38 अरब डॉलर इतकी होती, तर रेमिटन्स 79 अरब अब्ज डॉलर्स इतकी होती. या प्रकरणात भारताने चीनला मागे टाकले, कारण गेल्या वर्षी चीनला 32 अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक झाली. सुस्त भारतीय अर्थव्यवस्थेसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात परकीय भांडवल मिळणे ही दिलासा असल्याचे अहवालात म्हटले आहे.

गरीब देशांमध्ये वाढत आहे परकीय धन
माध्यम वर्गवारी असलेल्या देशांमध्ये विदेशी पैसे मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. 2017 मध्ये अशा देशांना ऐकून 483 अब्ज डॉलर एवढा परकीय पैसा मिळाला होता. जो 2018 मध्ये 529 अब्ज डॉलर्स वरती गेला होता. यावेळी 9.6 % वाढ झाल्याचे दिसून आले. अहवालानुसार, चीनला भारतानंतर 67 अब्ज डॉलर, मेक्सिकोला 36 अब्ज डॉलर्स, फिलीपिन्सला 34 अब्ज डॉलर्स आणि इजिप्तला 29 अब्ज डॉलर इतके विदेशी धन मिळाले होते.

Visit : Policenama.com