तुला पहाते रे मालिका होणार बंद? मालिके विरोधात केली तक्रार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तुला पाहते रे  हि ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिका कोणताही सामाजिक संदेश देत नाही म्हणून हि मालिका बंद करण्यात यावी अशी तक्रार पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते  प्रदीप नाईक यांनी हि तक्रार दाखल केली आहे.  प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे हे या मालिकेचे नायक आहेत.

तुला पहाते रे या मालिकेतून कसलाही सामाजिक संदेश दिला जात नाही उलट महाराष्ट्राच्या संस्कृतीला या पासून धोका निर्माण होणार आहे असे प्रदीप नाईक या तक्रारीत म्हणाले आहेत. या तक्रारी नंतर या मालिकेच्या संदर्भात जनसामान्यातून विरोध होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.

काय दाखवले जाते या मालिकेत

तुला पहाते रे या मालिकेत विक्रांत सरंजामे नावाचा उद्योगपती सुबोध भावे यांच्या रूपाने चित्रित केलेला आहे. इशा हि त्या मालिकेची नाईक मध्यमवर्गीय घरातून आलेली हि मुलगी विक्रांत सरंजामे यांच्या ऑफिसमध्ये जॉब करते आणि तिच्या जॉबच्या ठिकाणी मायरा आणि झेंडे हि पात्रे  खलनायकाची भूमिका वठवत आहेत. विक्रांत सरंजामे हे एके दिवशी इशाच्या कॉलेजमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जातात आणि त्या ठिकाणी इशाची आणि विक्रांत सरंजामे यांची ओळख होते. इशाच्या परिस्थितीकडे बघून तिला आपल्या ऑफिसमध्ये नोकरी देतात. त्यानंतर इशा हि विक्रांत सरंजामे यांच्या प्रेमात पडते आणि त्यानंतर त्या दोघांच्या  प्रेमाचे विविध रंग दाखवण्यात मालिका तल्लीन झाल्याचे पाहण्यास मिळते.

२०० कोटी रुपयांचा मालक इशाच्या घरी तेलाचे डबे वाहताना या मालिकेत पाहण्यास मिळाला. कारण फक्त एकच कारण ४० वर्षाच्या पुरुषाचे २१ वर्षाच्या मुलीवर प्रेम जडले आहे. विक्रांत सरंजामे यांच्या इशा वरील प्रेमात आणि त्यांच्या ऑफिस सभोवतालच्या वातावरणात हि मालिका गुंग झाली असून इशा आणि  विक्रांत सरंजामे यांच्या प्रेमात पूर्णपणे हि मालिका चित्रित करण्यात आली असून या मालिकेच्या कथानकावर समाजात जोरदार टीका केली जाते. काही लोक तर केवळ त्यावेळी कोणतीच पर्यायी मालिका बघायला नसते म्हणून ती मालिका बघतात. या मालिकेस विरोध होण्याचे कारण फक्त एकच आहे. जास्त वयाच्या पुरुषाचे वयाची मोठी तफावत असलेल्या आणि वयाने कमी असलेल्या मुलीशी दाखवले गेलेले प्रेम. याच कारणामुळे या मालिकेला आता समाजातून विरोध होतो आहे.