Actor Allu Arjun | अभिनेता अल्लू अर्जुन व दिग्दर्शक त्रिविक्रम यांच्या हिट जोडीचा कमबॅक; चौथ्या चित्रपटाची घोषणा

पोलीसनामा ऑनलाइन – दाक्षिणात्य सुपरहिट अभिनेता अल्लू अर्जुन (Actor Allu Arjun) हा नेहमी त्याच्या चित्रपटांमुळे चर्चिला जातो. त्याचे चित्रपट हे फक्त दक्षिण भागात नाही तर जगभरात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतात. अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करुन हिट सिनेमे प्रेक्षकांना दिले आहेत. अल्लू अर्जुनचे (Actor Allu Arjun) चाहते त्याच्या आगामी चित्रपटांसाठी नेहमी उत्सुक असतात. आता त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असून त्याचा लवकरच दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास (Director Trivikram Srinivasa) सोबत नवा कोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

अभिनेता अल्लू अर्जुनचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याचा मागील वर्षी आलेल्या पुष्पा सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आता अल्लू अर्जुनने दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास (Allu Arjun and Trivikram Reunite) यांच्या नवीन चित्रपटाची ऑफर स्वीकारली आहे. याआधी त्रिविक्रम व अल्लू अर्जुनने तीन सिनेमे एकत्र केले आहेत. त्यामध्ये सन ऑफ सत्यमुर्ती (Son Of Satyamurthy), अला वयकुनथापुर्रम्मूलू (Ala Vayakunthapurrammoolu) व जुलई (Julayi) या सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. आता ते चौथा चित्रपट सोबत करणार आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली आहे. या चित्रपटाची निर्मिती गीता आर्ट्स आणि हारिका हसीन क्रिएशन्स (Harika Hasin Creations) यांनी केली आहे. चित्रपटाची इतर माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Actor Allu Arjun) आगामी चित्रपटाची प्रतिक्षा त्याचा चाहत्यांना असते. त्याचा मागील वर्षी प्रदर्शित झालेला ‘पुष्पा: द राईज’ (Pushpa: The Rise) सिनेमा जबरदस्त चालला होता. लवकरच या चित्रपटाचा सिक्वेल म्हणजे ‘पुष्पा 2: द रुल’(Pushpa 2: The Rule) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title :   Actor Allu Arjun | allu arjun and trivikram reunite official announcement of fourth collaboration

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा