Ajit Pawar | ‘राज्यभरात बॅनर लावताना साहेबांचा फोटो लावा’, अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | रविवारी दुपारी अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाराष्ट्रालाच एक मोठा धक्का दिला आहे. अजित पवार यांनी बंड करत भाजप (BJP), शिवसेना (Shivsena) यांच्यासोबत सरकारमध्ये प्रवेश केला आहे. आता राज्यात दोन उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) असणार आहेत. त्याचबरोबर, महाराष्ट्रात आता शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी, अशी नवी युती असणार आहे. अजित पवारांसोबतच राष्ट्रवादीच्या (NCP) इतर 8 आमदारांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर राज्यभरात अजित पवारांसह 8 मंत्र्यांचे बॅनर झळकत आहेत.

रविवारी झालेल्या राजकीय भूकंपानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना पोस्टर (Poster) लावताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांचा फोटो लावण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. राज्यात काही ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बॅनर लागले आहेत. त्यावर शरद पवार यांचा फोटो नसल्यामुळे टीका होताना दिसत आहे. त्यामुळे आता पोस्टरवर शरद पवार यांचा फोटो असावा, अशी सूचना अजित पवार यांनी केल्याची माहिती आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यभरात कुठेही पोस्टर लावणार असाल तर त्यावर शरद पवार यांचा फोटो लावण्याचे आदेश अजित पवार यांनी दिल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी आपल्या सोबत असल्याचा दावा अजित पवार यांच्या गटाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी देवगिरी बंगल्यावर (Devagiri Bungalow) शपथ घेतलेल्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला पाठिंबा देणारे आमदार (MLA) देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Web Title : Ajit Pawar | ajit pawar orders ncp party workers to put up sharad pawars photo while putting up banners across the state

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा