Actor Dhanush New Look | धनुषचा नवीन हटके लुक; नेटकरी व चाहते चक्रावले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Actor Dhanush New Look | आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणारा अभिनेता धनुष (Dhanush) नवा हटके स्टाईलमध्ये एअरपोर्टवर स्पॉट झाला आहे. धनुषने फक्त दाक्षिणात्य नाही तर बॉलीवूड (Bollywood) आणि हॉलीवूडमध्ये (Hollywood) देखील लोकप्रियता मिळवली आहे. धनुष त्याच्या नवनवीन भूमिका व स्टाईलसाठी चर्चेत असतो. सध्या त्याचा एअरपोर्टवरील (Airport) एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील धनुष अगदी ओळखू देखील येत नाही. त्याच्या या लूकने अनेकांचे लक्ष वेधले आहे. धनुषच्या या नव्या लूकचं (Actor Dhanush New Look) कौतुक पण होत आहे आणि काही त्याला ट्रोल करत आहेत.

Advt.

धनुष सोमवारी (29 मे) सकाळी एयरपोर्टवर दिसला होता. यावेळी त्याचे वाढलेले केस, वाढलेली दाढी आणि डोळ्यांवर गॉगल अशा लूकमुळे तो ओळखू देखील येत नव्हता. मात्र, तरी धनुषच्या चाहत्यांनी एअरपोर्टवर त्याला ओळखलेच व त्याच्यासोबत सेल्फी (Selfie) काढला. धनुषचे एअरपोर्टवरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे. या फोटो आणि व्हिडीओवर अनेक लोक कमेंट्स करत आहेत.

या कमेंट्समध्ये काही मज्जेदार कमेंट्स देखील येत आहे. एकाने व्हिडीओवर कमेंट केली, ‘मला वाटतंय धनुष बाबा रामदेव यांचा बायोपिक बनवणार आहे.’ आणखी एका नेटकऱ्याने सुद्धा धनुषच्या व्हिडीओला कमेंट केली, ‘रामदेव बाबांसारखा (Ramdev Baba) दिसत आहे.’ तर दुसऱ्या युझरनं या व्हिडीओला कमेंट केली आहे की, त्याला नव्या अवतारात लोकांनी कसे ओळखले ? तो पूर्णपणे वेगळा दिसत आहे. (Actor Dhanush New Look)

अभिनेता धनुष हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चिला जातो. अभिनेते रजनीकांत (Actor Rajinikanth)
यांची मुलगी ऐश्वर्या व धनुष (Aishwarya- Dhanush) यांनी 2004 साली लग्न केले.
आणि 18 वर्षांच्या संसारानंतर विभक्त झाले. धनुषने ‘द ग्रे-मॅन’ (The Gray-Man) या हॉलिवूड चित्रपटात
देखील काम केले आहे.
धनुष हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असून त्याला इन्स्टाग्रामवर 5.8 मिलियन फॉलोवर्स आहेत.

Web Title :  Actor Dhanush New Look | Dhanush’s new haute look; Netkari and fans were confused

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘काँग्रेसला खुश करण्यासाठी उद्धव ठाकरेंची लाचारी!!’, ‘ते’ फोटो ट्विट करत भाजपचा टोला

Pune PMC News | पुणे महानगरपालिका : तुमच्या भागातील नाले सफाईची कामे झाली नसतील तर ‘या’ 2 मोबाईलवर संपर्क साधा, जाणून घ्या नंबर

Adipurush Cinema | आदिपुरूष चित्रपटाचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; अवघ्या तासाभरात केला मिलियनस टप्पा पार (VIDEO)