Actor Sanjay Dutt | शाहरुख आणि प्रिती नंतर आता अभिनेता संजय दत्तने घेतला क्रिकेटचा ‘हा’ संघ विकत

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडचा मुन्नाभाई अर्थात अभिनेता संजय दत्त (Actor Sanjay Dutt) हा कायम विविध कारणांवरुन चर्चेत असतो. त्याने मनोरंजन क्षेत्रात तर आपल्या अभिनय कौशल्य दाखवून दिले आहे त्याचबरोबर तो अनेक व्यवसायात गुंतवणूक करताना दिसतो. आता त्याने आणखी एका क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. अभिनेता संजय दत्त (Actor Sanjay Dutt) आता क्रिकेट क्षेत्राकडे वळाला असून त्याने गुंतवणूक केली आहे. ‘एरीज ग्रुप ऑफ कंपनीज’चे संस्थापक, अध्यक्ष व सीईओ सोहन रॉय (Sohan Roy) यांच्यासह संजय ‘हरिकेन्स’ संघाचा सहमालक बनला आहे. (Hurricanes Team)

झिम्बाब्वे जिम आफ्रो तर्फे ‘टी१०’ (Zimbabwe Jim Afro T10) या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या 20 जुलैपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. क्रिकेटची (Cricket)ही ‘टी१०’ स्पर्धा झिम्बाब्वेमधील हरारे येथे पार पडणार आहे. या स्पर्धेमध्ये बॉलीवूड अभिनेता संजय दत्तची ‘हरिकेन्स’ ही टीम स्पर्धेक म्हणून सहभागी होणार आहे. ही स्पर्धा 20 जुलै ते 29 जुलै दरम्यान पार पडणार आहे. यामध्ये संजय दत्तची ही टीम कशी खेळी खेळणार यांकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

बॉलीवुड सेलिब्रिटी आणि क्रिकेटचे जुने संबंध असल्याचे दिसून येते. या आधी अभिनेता शाहरुख खान
(Actor Shah Rukh Khan), अभिनेत्री प्रिती झिंटा (Actress Preity Zinta) यासारख्या सितांऱ्यांनी क्रिकेटमध्ये मोठी गुंतवणूक केलेली दिसते. या यादीमध्ये आता अभिनेता संजय दत्तचे नावाची भर पडली आहे. याचबरोबर त्याने अलीकडेच अल्कोबेव्ह स्टार्टअप कार्टेल आणि ब्रदर्समध्ये (AlcoBev Startup Cartel And Brothers) गुंतवणूक केली आहे. गुंतवणुकीची रक्कम किती आहे हे अद्याप कळाले नसले तरी हा करार कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे त्याने मनोरंजन क्षेत्रातही अनेक गुंतवणूक केली आहे. अभिनेता संजय दत्त (Actor Sanjay Dutt) हा करोडपती असून 2022 पर्यंत त्याची एकूण संपत्ती १३७ कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. त्याच्या या वाढत्या गुंतवणूकीमुळे त्याच्या संपत्तीत आणखी भर पडली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title :   Actor Sanjay Dutt | bollywood actor sanjay dutt bought harare hurricanes cricket team in zimbabwes zim afro t10 tournament

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Major General Smita Devrani and Brigadier Amita Devrani Receive Prestigious National Florence Nightingale Awards for Exemplary Service in Nursing

Unveiling the Truth: Atal Bihari Vajpayee, the Right Man in the Right Party

C-DAC Collaborates with Bharati Vidyapeeth (Deemed to be University) College of Engineering, Pune, to Introduce New Technical Courses

Lonavla Residents Duped in Chardham Yatra Scam: 37 Victims Seek Justice

Autorickshaw Driver Arrested for Stealing Temple Bell: Kondhwa Police Crack the Case

India Takes Flight: Pioneering Female Representation among Commercial Pilots Globall