Actor Sunil Shende | मराठी सिनेसृष्टीतले दिग्गज अभिनेते सुनील शेंडे काळाच्या पडद्याआड,पारशीवाडा स्मशानभूमीत करण्यात येणार अंत्यसंस्कार

पोलीसनामा ऑनलाईन – मराठी सिनेसृष्टीतुन (Marathi Cinema) एक वाईट बातमी समोर येत आहे. लोकप्रिय हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेले मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे (Actor Sunil Shende) यांचे निधन झाले आहे. मुंबईतील विलेपार्ले पूर्व येथील राहत्या घरी पहाटे एकच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेते सुनील शेंडे हे ७५ वर्षांचे होते. सोमवारी दुपारी अंत्ययात्रा (Sunil Shende Funeral Procession) निघणार आहे. तसेच त्यांच्या पार्थिवावर पारशीवाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

महत्वाची बाब म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचा मोठा आजार नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मात्र मागील काही दिवसांपासुन ते एपिलेप्सीच्या किरकोळ त्रासातून जात होते. दरम्यान काल रात्री त्यांच्या राहत्या घरी त्यांना अचानक फिट आली आणि ते पडले. त्यानंतर त्यांना ताबडतोब नानावटी हॉस्पिटलमध्ये (Nanavati Hospital) दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सुनील यांच्या पश्चात पत्नी ज्योती आणि दोन मुले हृषिकेश आणि ओंकार असा परिवार आहे.
अभिनेते सुनील शेंडे (Actor Sunil Shende ) यांनी ‘गांधी’, ‘सरफरोश’ आणि ‘वास्तव’ यांसारख्या लोकप्रिय
हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी ‘काथुंग’ , ‘निवडुंग’, ‘मधुचंद्राची रात्र’, ‘जसा बाप तशी पोर’,
‘ईश्वर’, ‘नरसिम्हा’ या गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अभिनेते सुनील शेंडे (Actor Sunil Shende) यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आपल्या उत्तम
अभिनयाची छाप सोडली.दरम्यान बऱ्याच दिवसांपासून ते या लाइमलाइटपासून दूर आहेत.

Web Title :-   actor sunil shende passed away late last night at his residence located east of vile parle marathi hindi cinema

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kirit Somaiya | जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या पोलीस गुंडानी केलेल्या कृत्याची आव्हाड माफी मागणार का? – किरीट सोमय्या

Supriya Sule | जितेंद्र आव्हाडांनी राजीनाम्याचा विषय डोक्यातून काढून टाकावा – सुप्रिया सुळे