Kirit Somaiya | जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या पोलीस गुंडानी केलेल्या कृत्याची आव्हाड माफी मागणार का? – किरीट सोमय्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे (NCP) आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर गेल्या तीन दिवसांत दोन गुन्हे दाखल झाले आहेत. एक म्हणजे त्यांच्यावर ठाण्यातील विवियाना मॉलमधील ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) चित्रपटाचा प्रयोग बंद पाडून प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. दुसरे त्यांच्यावर विनयभंग केल्याचा गुन्हा देखील मुंब्रा पोलीस ठाण्यात (Mumbra Police Station) दाखल करण्यात आला आहे. भाजपशी (BJP) संबंधित महिलेने हा गुन्हा दाखल केला आहे. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेवर भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्वीट केले आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी त्यांच्यावर आरोप करत माफी मागणार का, अशी विचारणा केली आहे.

जितेंद्र आव्हाड आज तथाकथित अन्यायाविरोधात ओरडत आहेत. अनंत करमुसे (Anant Karmuse) याचे आव्हाड आणि त्यांच्या पोलीस गुंडांनी अपहरण केले होते. तसेच अनंत करमुसे याला मारहाण देखील केली होती. आव्हाड या प्रकरणी माफी मागणार का? असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे.

जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्र्यांच्या एका कार्यक्रमात गेले होते. यावेळी तेथे मोठी गर्दी उसळली होती.
आव्हाड यावेळी गर्दीतून वाट काढत असताना त्यांनी एका महिलेला हाताने बाजूला सारले होते.
त्यानंतर त्यांच्यावर त्या महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे या सर्व आरोपांना आणि अटकेला कंटाळून आव्हाडांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या राजीनाम्याला गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जबाबदार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) केला आहे. खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी मात्र आव्हाडांनी राजीनाम्याचा विषय डोक्यातून काढून टाकण्याचे आवाहन त्यांना केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता आव्हाड काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title :-  Kirit Somaiya | jitendra awhad decision of mla post resignation kirit somaiya criticizes on anant karmuse beating case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nimrit Kaur Ahluwalia | बिग बॉस स्पर्धक निमृत कौर अहलुवालिया डिप्रेशनमध्ये, समोर आलं धक्कादायक कारण…

Ashish Shelar On Jitendra Awhad | ‘जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा द्यावा, आम्ही ती जागा जिंकू’ – भाजप

Supriya Sule | जितेंद्र आव्हाडांनी राजीनाम्याचा विषय डोक्यातून काढून टाकावा – सुप्रिया सुळे