Actor Tamanna Bhatia | तमन्नाच्या ‘या’ नव्या वेबसिरीजमधील अभिनयावर प्रेक्षक फिदा

पोलीसनामा ऑनलाइन – विविध आशयाच्या भूमिका करून प्रेक्षकांची मने जिंकणारी बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया (Actor Tamanna Bhatia) ही आता पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीची भूमिका साकारताना दिसणार आहे. तमन्ना अनेक दिवसांपासून तिच्या आगामी प्रोजक्ट्स् आणि तिचे प्रेमप्रकरण यामुळे चर्चेत आहे. आता तमन्नाची (Actor Tamanna Bhatia) ‘जी करदा’ ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली असून तिच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. तमन्नाची ही नवी वेबसिरीज प्रेक्षकांना ॲमेझॉन प्राइम (Amazon Prime) वर बघता येणार आहे.

दिग्दर्शक अरुणिमा शर्मा (Director Arunima Sharma) दिग्दर्शित या ‘जी करदा’ (Jee Karda) वेबसिरिजमध्ये बालपणीच्या मित्रांच्या कहानी दाखवण्यात आली आहे. या सर्व सात मित्रांना ठरवले होते त्याप्रमाणे आयुष्य नाही हे वयाच्या 30 व्या वर्षी लक्षात येते आणि त्याभोवती गोष्ट फिरते. या वेबसिरिजचे निर्माते दिनेश विजान (Producer Dinesh Vijan) आहेत. यामध्ये प्रमुख भूमिकेत अभिनेत्री तमन्ना भाटिया सोबत सुहैल नय्यर (Suhail Nayyar), आशिम गुलाटी (Ashim Gulati), अन्या सिंह (Anya Singh), हुसैन दलाल (Hussain Dalal), संवेदना सुवालका (Sanvedana Suwalka) आणि सायन बनर्जी (Sion Banerjee) हे कलाकार दिसणार आहेत.

तमन्नाच्या या नव्या वेबसिरीजमुळे तमन्ना प्रकाशझोतात आली आहे. काही दिवसांनंतर तमन्नाची ‘लस्ट स्टोरी 2’ (Lust Story 2) ही वेबसिरीज नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामध्ये ती तिचा बॉयफ्रेंड अभिनेता विजय वर्मा (Actor Vijay Verma) सोबत पहिल्यांदा स्क्रिन शेअर करणार आहे. तसेच यामध्ये बॉलीवुड अभिनेत्री काजोल (Actress Kajol) ही देखील भूमिका साकारणार असून ती ओटीटी (OTT) वर पदार्पण करणार आहे. तमन्नाच्या (Actor Tamanna Bhatia) वेब सिरीजची सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे.

Web Title : Actor Tamanna Bhatia | tamannaah bhatia won the hearts of the audience with her role in jee karda

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Petrol-Diesel Price Today | आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय? जाणून घ्या प्रमुख शहरातील दर

Pune Crime News | आरटीओचा भोंगळ कारभार, आयो जायो घर तुम्हारा ! आरटीओमध्ये परस्पर 9 वाहनांना दिले बनावट सटिर्फिकेट

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रासह काही राज्यात पावसाच्या सरी; उत्तर भारतात उन्हाचा तडाखा कायम

Biporjoy Cyclone Updates | गुजरातनंतर आता ‘बिपरजॉय’ राजस्थानला धडकणार; अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’

Pune Gold Rate Today | आज पुण्यातील सोन्या-चांदीचे दर काय? जाणून घ्या