KGF सुपरहिट झाल्यानंतर ‘यश’चा झाला जबरदस्त फायदा ! लागली मोठ्या ब्रँड्सची लाइन

पोलीसनामा ऑनलाइन – साऊथ सुपरस्टार यश (Yash) गेल्या अनेक दिवसांपासून मोस्ट अवेटेड सिनेमा केजीएफ चॅप्टर 2 (KGF Chapter 2) मुळं चर्चेत आहे. केजीएफ (KGF) हा सिनेमा 2018 साली रिलीज झाला होता. या सिनेमाच्या यशाचं मोठं कारण आहे तो म्हणजे अभिनेता यश. त्याच्या अप्रतिम अभिनयानं या सिनेमानं हा टप्पा गाठला. सिनेमाच्या यशानं त्यालाही मोठा फायदा झाला.

यशनं याआधीही अनेक ब्रँड एंडोर्स केले आहेत. परंतु या सिनेमाच्या यशानंतर यशचं फॅनडॅम वाढतच गेलं. त्यामुळं त्याला अगदी मेन स्ट्रीम ब्रँडपासून तर किचनमध्ये युज होणारे ब्रँडही मिळाले. कमी काळात त्यानं एकापेक्षा एक ब्रँड साईन केले.

Advt.

यश जवळच्या सूत्रांनी सांगितलं की, यशकडे अनेक ब्रँड्स होते. परंतु केजीएफ रिलीज झाल्यानंतर तो ब्रँड सर्किटमध्ये एक हॉट टॉपिक बनला. त्यामुळं अधिकाधिक ब्रँड्स त्याच्याशी संपर्क साधत आहेत, जे खास करून देशातील तरुण प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. आतापर्यंत यशला त्याच्या पॅन इंडिया कॅम्पेन अंतर्गत एक ऑटोमोबाईल ब्रँड आणि एक फोन ब्रँडकडून ऑफर मिळत आहेत जे लकवरच नवीन वर्षात लाँच होणार आहेत. हा करार जवळपास साईन झाला आहे. केजीएफ 2 सोबत यशची लोकप्रियता आणि त्याचे सिनेमे रिलीज होण्याची प्रतीक्षा दिवसेंदिवस वाढत आहे असंही सूत्रांचं म्हणणं आहे.

केजीएफ चॅप्टर 2 हा सिनेमा 2018 साली आलेल्या केजीएफ चॅप्टर 1 सिनेमाचा सिक्वल आहे. कन्नड सुपरस्टार यश आणि श्रीनीधी शेट्टी यांच्या व्यतिरिक्त या सिनेमात संजय दत्त आणि रवीना टंडन हेदेखील प्रमुख भूमिकेत असणार आहेत. सिनेमाच्या पहिल्या पार्टनं जवळपास 200 कोटींची कमाई केली होती.