अभिनेत्री नताशा सुरी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, घरातच झाली क्वारंटाईन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये अनेक कोरोना पॉझिटिव्ह केसेस समोर येत आहेत. अशातच आता अभिनेत्री आणि २००६ मिस इंडिया वर्ल्ड नताशा सुरी हिचा कोरोना अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला आहे. सध्या ती आपल्या घरी क्वारंटाईन आहे.

नताशाने सांगितले की, या महिन्याच्या सुरुवातीला पुण्यात गेली होती आणि मुंबईत परतल्यानंतर लगेचच आजारी पडली. सर्व प्रकारची काळजी घेतल्यानंतर सुद्धा परत आल्यावर ताप येऊन, घशात खव खव होत होती. म्हणून मी चाचणी केली असता. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर मी घरातच क्वारंटाईन झाले. तर कुटुंबातील इतर जणांची सुद्धा चाचणी करण्यात येणार असल्याचं तिने सांगितलं.

दरम्यान, एकीकडे मुंबईतील कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत चालली असताना, दुसरीकडे कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. शनिवारी संध्याकाळी संजय दत्तला अचानक श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने तातडीने त्याला लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण संजय दत्ताचे दोन्ही चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

तर काही दिवसांपूर्वी बिग बी अमिताभ बच्चन, अभिषेक व ऐश्वर्या बच्चन यांच्यासोबत त्यांच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाल्याने त्यांना नानावटी रुग्णालयात हलवण्यात आलं होत. अमिताभ यांना काही दिवसांपूर्वी तर अभिषेकला शनिवारी चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like