‘गंदी बात’ फेम अभिनेत्री गेहाना वशिष्ठला मुंबई पोलिसांकडून अटक

मुंबई : गंदी बात फेम अभिनेत्री गेहाना वशिष्ठ हिला मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने अटक केली आहे. वेब सिरीजच्या नावाखाली पॉर्नोग्राफिक व्हिडिओ शुट करुन ते वेबसाईटवर अपलोड केले जात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे गेहाना वसिष्ठ हिचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊस असून त्याद्वारे पॉर्न व्हिडिओ साईटवर अपलोड केले जात होते. याप्रकरणी पोलिसांनी गेहाना वशिष्ठ हिला अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगल्यावर छापा टाकला होता. त्या ठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याने पोलिसांनी कारवाई करुन ५ जणांना अटक केली होती. एका तरुणीची सुटका केली होती. अटक केलेल्या ५ जणांमध्ये २ अभिनेते व २ तरुणींचा समावेश होता. दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशीब अजमाविण्यासाठी मुंबईत आला होत्या. त्या पॉर्नोग्राफिक व्हिडिओ तयार करणार्‍या प्रॉडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या.

 

 

 

 

या प्रकरणाच्या तपासात गेहाना वशिष्ठ हिचे नाव समोर आले. गेहाना वशिष्ठचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊस असून त्याद्वारे वेब सिरीज, शॉर्ट फिल्मच्या नावाखाली पॉर्नोग्राफिक व्हिडिओ तयार करुन ते वेबसाईटवर अपलोड केले जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी तिला अटक केली असून आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

गंदी बात फेम गेहाना हिने मिस आशिया बिकिनी ताज जिंकला होता. तिने हिंदी, तेलगु सिनेमा तसेच अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे. गहनाने ८७ अश्लिल व्हिडिओ आणि पॉर्न व्हिडिओ शुट केले आहेत़. ते तिने तिच्या वेबसाईटवर अपलोड केले आहेत. या चॅनेलचे सदस्यता घेऊन व्हिडिओ पाहण्यासाठी २ हजार रुपये द्यावे लागतात़