बॉलिवूडमध्ये आपली आनोखी छाप सोडणाऱ्या अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे मुंबईत निधन झाले. परिचय, शोले, त्रिशुल, राम तेरी गंगा मैली, नूरी अशा सुपरहिट चित्रपटातून आपला अप्रितम अभिनय रसिकांसमोर मांडण्याचा गीता काक यांनी प्रयत्न केला. काल 14 डिसेंबरला त्यांनी अंतिम श्वास घेतला. सुप्रसिद्ध टीव्ही होस्ट आणि निर्माता सिद्धार्थ काक यांच्या त्या पत्नी आहेत. गीता यांनी परिचय गुलजार दिग्दर्शित चित्रपटांतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात जितेंद्र आणि जया बहादूरी या मुख्य भूमिकेत होत्या. गरम हवा या 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील भूमिकेचे कौतूक केले गेले.

70 व 80 च्या दशकात गीता यांनी एकापेक्षा एक चित्रपटात काम केले. शौकिग, गमन, देश, प्रेमी, मंडी, अर्थ, निशान अशा चित्रपटातून काम केले. गीता यांनी सिद्धार्थ काक यांच्याशी लग्न केले. दोघांना अंतरा नावाची एक मुलगी आहे.

सिद्धार्थ काक यांनी सुरभी या टीव्ही शो मधून अपार लोकप्रियता मिळाली. 1990 ते 2001 या काळात दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या शोच्या गीता या आर्ट डायरेक्टर होत्या. गीता चित्रपटांशिवाय समाजकार्यातही सक्रीय होत्या.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/